रत्नागिरी : रत्नागिरीतील अंतर्गत वादाचा फटका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला आहे. वरिष्ट पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देत मनसेला मनापासून राम राम केला आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत यांच्यासमवेत अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश केला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या माध्यमातून हे प्रवेश करत मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी रामराम करत भाजपाची वाट धरली. आगामी नगरपालिका निवडणुका समोर ठेवून लवकरच भाजपमध्ये प्रवेशाचा धमाका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेचे रुपेश सावंत यांच्यासमवेत शहरातील विविध भागांतील मनसे कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

हेही वाचा – Dr. Manmohan Singh Death: “जे त्यांनी न बोलता करून दाखवलं, ते अनेकांना…”, राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना सोशल पोस्टमधून श्रद्धांजली!

हेही वाचा – Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी सरचिटणीस सतेज नलावडे, उत्तर जिल्हाध्यक्ष केदार साठे, डॉ. विनय नातू, प्रमोद जठार, महिला प्रदेश सरचिटणीस शिल्पा मराठे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष, विधानसभा प्रमुख, तालुकाध्यक्ष, मोर्चा, शहराध्यक्ष उपस्थित होते.