गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र िलग निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्य़ात सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी दिले.     येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गर्भधारणा व प्रसवपूर्व निदान तंत्र िलग निवडीस प्रतिबंध जिल्हास्तरीय दक्षता समितीची बठक जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ई. रवींद्रन, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, निवासी उपजिल्हाधिकारी माधव कुसेकर, उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुळसीदास मोरे, प्रांताधिकारी तुषार मठकर, तहसीलदार विकास पाटील, रवींद्र बाविस्कर, जयराज देशमुख, गीता गायकवाड, विजय तळेकर आदींसह सर्व डॉक्टर उपस्थित होते.  जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह म्हणाले, प्रत्येक एफ फॉर्मची व संशयित सोनोग्राफी सेंटर्सची तपासणीही अत्यंत काटेकोरपणे करा यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी करू नका, तसेच सोनोग्राफी सेंटर्सचा तपासणी अहवाल वेळेत सादर करण्यात यावा. तसेच औषध विक्रेत्यांच्या औषधांचा साठा तपासणी करतानाही कुठेही नियमांचे उल्लंघन केले जात नाही याची खात्री करा यामध्ये काही गरप्रकार आढळल्यास समितीपुढे तात्काळ सादर करा. गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र िलग निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने सजगतेने काम करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी दिले.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने यांनी मागील बठकीत समिती अध्यक्षांनी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही केली असल्याचे सांगितले. साहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व जिल्हा रुग्णालय तपासणी पथकामार्फत दिनांक ५ डिसेंबर २०१२ रोजी मालवण व कुडाळ तालुक्यांतील एकूण ६ औषध दुकाने व गर्भपात केंद्र असलेल्या खासगी रुग्णालयांची धडक तपासणी करण्यात आली आहे असे सांगितले. जिल्ह्य़ातील  ५४ सोनोग्राफी सेंटर्स व ४३ गर्भपात केंद्राची सखोल तपासणी करण्यात आली आहे. तसेच याचा अहवालही जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे, तसेच या कायद्याची प्रचार व प्रसिद्धी होण्यासाठी  ‘‘मुलगी वाचवा व देश वाचवा’’ या विषयावर तालुकावार कार्यशाळाही घेण्यात आलेल्या आहेत.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने म्हणाले, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे तालुका सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला येथील सर्व सोनोग्राफी केंद्रधारकांना ऑनलाइन एफ फॉर्म भरण्याचे प्रशिक्षण देऊन यूजर आयडी व पासवर्ड देण्यात आले आहेत, असेही या वेळी सांगितले.