मोठी बातमी… शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील घरावर ईडीचा छापा; सोमय्यांनी केलेला १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच केलेला

arjun khotkar
किरीट सोमय्यांनी केलेले १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) शुक्रवारी (२६ नोव्हेंबर २०२१ रोजी) सकाळी छापा टाकला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आलीय.

जालन्यामध्ये शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या घरी आज सकाळी साडेआठ वाजता ईडीचा छापा पडला. खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये आहे. १२ जणांचं पथक या ठिकाणी तपासणी करत आहे. आतमधून दरवाजे बंद केले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीय.

छापा पडला तेव्हा अर्जुन खोतकर हे घरीच होते अशी माहिती समोर आली आहे. औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये अर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केलेली. यापूर्वी खोतकरांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत. मालक नाही, असं खोतकर यांनी स्पष्ट केलेलं.

किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वीच आरोप केले होते. जालन्यातील रामनगर साखर कारखान्यांच्या व्यहारांमध्ये, औरंगाबादमधील ज्या व्यवसायिकांवर छापेमारी झाली त्या उद्योजकांशी खोतकरांचे अर्थिक संबंध असल्याचा आरोप सोमय्यांनी केलेला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jalana enforcement directorate raid at shivsena leader arjun khotkar house scsg