कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात जलयुक्त शिवारअंतर्गत सुमारे ५ कोटी खर्चातून सलग समतर चराची कामे करण्यात आली. मात्र, ही कामे जेसीबीद्वारे केली असताना देयकासाठी मात्र केलेल्या कामावर मजुरांची उपस्थिती दाखविण्यात आली! कामाची तपासणी करणाऱ्या पथकासमोर हा प्रकार उघडकीस झाल्याने हे प्रकरण जिल्हाभर चच्रेचा विषय बनले आहे. याची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी या प्रकरणी तत्काळ बठकीचे आयोजन केले आहे.
कृषी विभागांतर्गत जलयुक्त शिवार अभियानात ही कामे हाती घेण्यात आली. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १५ कोटींपेक्षा अधिक खर्चाची कामे झाली आहेत. विशेष म्हणजे कृषी विभागाने सुरुवातीला ३ लाख रुपये खर्चाचा आराखडा केला. परंतु ही रक्कम अधिक होत असल्याचे पथकातील सदस्यांच्या निदर्शनास आल्याने पुढे मात्र एका कामाचा खर्च दीड लाख रुपये दाखविण्यात सुरुवात झाली. इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही, तर आता या कामावर १ लाख २० हजार रुपये खर्च दाखविला जात आहे. १२४ गावांत ही कामे चालू असून, त्यातील २०७ कामाची पथकाकडून तपासणी सुरू आहे. चिंचोली, निळोबा, उकळी, सिध्देश्वर, अनखळी, बेरूळा, वारंगाफाटा, नांदापूर, रांजाळा, असोला आदी ठिकाणच्या कामांवर आतापर्यंत कृषी विभागाने सुमारे ५ कोटी कामाची देयके अदा केली आहेत.
कृषी विभागाने कामे जेसीबीद्वारे केली असताना काम मात्र मजुरांमार्फत केल्याचे दाखवून १० ते २० टक्के रक्कम अधिक दाखविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप या कामाविषयी केला जात आहे. कृषी विभागाकडून झालेल्या २०७ कामांची तपासणी सुरू आहे. जेसीबीद्वारे केलेल्या कामावर मजूर दाखवून २० टक्के जादा रक्कम घेता येते. जेसीबीद्वारे हेच केलेले काम लवकर आटोपते, म्हणून कामावर मजूर दाखवून अधिक रक्कम काढण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी बठकीचे आयोजन केले असून बठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jcb works labour attendance
First published on: 10-06-2015 at 01:55 IST