‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटामुळे मागील काही दिवसांपासून चांगलाच वाद रंगला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आक्रमक भूमिका घेत ठाण्यात या चित्रपटाचे काही शो बंद पाडले. दरम्यान, याच कारणामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या सर्व घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीही या चित्रपटाबाबत काही आक्षेप घेतले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे.

हेही वाचा >> “सावरकरांसोबत बाळासाहेब ठाकरेंनाही…”, संजय राऊतांचं शिंदे गटावर आणि भाजपावर टीकास्र!

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेला आहे. याच कारणामुळे मनसेने या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने या चित्रपटाला विरोध केला आहे. दरम्यान, बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी या चित्रपवर आक्षेप घेतल्यानंतर आव्हाड यांनी ट्विटद्वारे राज ठाकरेंवर टीका केली आहे. आपल्या या ट्वीटमध्ये ‘हर हर महादेव’ हा चित्रपट कुठल्याही ऐतिहासिक संदर्भाला धरुन नाही, असे बाजीप्रभू देशपांडे यांच्या सर्व वंशजांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले. आतातरी त्याचे समर्थन करणाऱ्यांचे डोळे उघडतील का ? किंवा ज्यांनी या चित्रपटाला आवाज दिला आहे, ते तरी हा चित्रपट दाखवू नका, अशी मागणी करतील का? हाच चित्रपट इतर भाषांमध्येही दाखवण्यात येणार आहे, तो रद्द करतील का?,’ असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.

हेही वाचा >> अजित पवार यांचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन, म्हणाले ‘…हीच खरी आदरांजली ठरेल’

बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचा आक्षेप काय?

“चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख सातत्याने अरेतुरेच्या भाषेत दाखवला. हे अतिशय खटकणारं आहे आणि चुकीचं आहे. दुसरा आक्षेप हिरडस मावळ येथे समुद्र दाखवला आहे. प्रत्यक्षात येथे कुठेही समुद्र नाही. तिथे नदी आहे. तिसरा आक्षेप म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे या सख्ख्या भावांमध्ये ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली भांडण दाखवलं आहे. लहानपणीचं भांडण दाखवून त्याला विश्वासघात असं नाव दिलंय,” असे मत रतन देशपांडेंनी व्यक्त केले.

हेही वाचा >> VIDEO: बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांचे ‘हर हर महादेव’ चित्रपटावर गंभीर आक्षेप, म्हणाले, “चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चौथा आक्षेप म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे त्याक्षणी तेथे उपस्थित नव्हते. मात्र, चित्रपटात बाजीप्रभू तंबूच्या बाहेर हजर असल्याचं दाखवलं आहे. त्यावेळी बाजीप्रभू दुसऱ्या मोहिमेवर होते. पाचवा आक्षेप चित्रपटात अफजल खानाला आणण्यासाठी बाजीप्रभूंनी वाईट गवंडी घेऊन खोट्या पद्धतीची मंदिरं बांधली असं दाखवण्यात आलं आहे,” असे आक्षेप बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी घेतले आहेत.