राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाड आणि एलन पटेल यांचा विवाहसोहळा ७ डिसेंबर रोजी रजिस्टर पद्धतीने पार पडला. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. मात्र आव्हाड यांची मुलगी नताशा आणि एलन यांनी नुकताच गोव्यामध्ये पारंपारिक ख्रिश्चन पद्धतीनेही विवाह केला. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या लग्नानंतर हा ख्रिश्चन पद्धतीचा विवाह कशासाठी अशी टीका काहींनी आव्हाड यांनी ट्विट केलेल्या या विवाह सोहळ्याच्या व्हिडीओवर केल्यानंतर यासंदर्भात आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आव्हाड यांनी १९ डिसेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास मुलीच्या विवाह सोहळ्यातील व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी, “आता माझी चिमुकली नताशा एलन पटेल झालीय,” अशी कॅप्शन दिली होती.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

या ट्विटवर अनेकांनी आधी साध्या पद्धतीने विवाह केल्यानंतर आता ख्रिश्चन पद्धतीने थाटामाटात विवाह केल्याच्या मुद्द्यावरुन भाष्य केल्याचं दिसून येत आहे. याच टीकेला आव्हाड यांनी रात्री दहाच्या सुमारास अन्य एका ट्विटमधून उत्तर दिलं. “काही विकृत लोकांच्या माहितीसाठी, एलन हा ख्रिश्चन असल्याने ख्रिश्चन पद्धतीने त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार गोव्यामध्ये हा विवाह सोहळा पार पडला. नताशानेही स्वत:च्या इच्छेनुसार यासंदर्भात निर्णय घेतला. हे दोघेही स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे,” असं आव्हाड यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.

आव्हाड यांनी ट्विट केलेल्या आणखीन एका व्हिडीओमध्ये ते स्वत: या ख्रिश्चन पद्धतीच्या विवाह सोहळ्यामध्ये वधू पित्याकडून केल्या जाणाऱ्या विधींमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. या व्हिडीओत आव्हाड मुलीच्या मागे स्टेजपर्यंत चालत जाताना दिसत आहेत. “आयुष्यभराची आठवण… नताशाचं एलनसोबत लग्न झालं,” अशी कॅप्शन आव्हाड यांनी या व्हिडीओला दिलीय.

या ट्विटवरही स्पष्टीकरण देताना आव्हाड यांनी ख्रिश्चनपद्धतीने विवाह सोहळा साजरा करण्यापासून एलन आणि त्याच्या कुटुंबियांना मी रोखणारे आपण कोणीही नाही, असं म्हटलंय. “प्रत्येक धर्मामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रथा असतात त्यांचा आदर करणे गरजेचे असते. एलन हा ख्रिश्चन असल्याने आनंद साजरा करण्याच्या त्यांच्या स्वत:च्या पद्धती आहेत. त्यांना त्यापासून रोखणारा मी कोणीही नाही,” असं ट्विट आव्हाड यांनी केलंय.

७ डिसेंबर रोजी आव्हाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी अगदी साध्या पद्धतीने रजिस्टर विवाह केल्यानंतर नताशा आणि एलनने रविवारी गोव्यामध्ये ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केलं. ७ डिसेंबर रोजी आव्हाड यांच्या मुलीच्या लग्नाचे बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होती.

आव्हाड झाले भावूक…
मुलीच्या विवाहसोहळ्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पहायला मिळालं होतं. “२५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे,” असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.  “कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार…घरातील घरपण गेल्यासारखं असेल,” असंही आव्हाड म्हणाले होते.