अजित पवार यांनी शुक्रवारी ( ३० जुलै ) विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी ( २ जुलै ) अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “विरोधी पक्षनेता हा संख्येवरून ठरवला जातो. सध्यातरी आमची संख्या जास्त आहे. उद्या काय होते, ते पाहूया. संख्या कमी असली, तरी आम्हाला विरोधी पक्षनेतेपद द्या, यासाठी आम्ही आग्रही नाही. इतके अपरिपक्व वागणे राष्ट्रवादी करणार नाही.”

हेही वाचा : राष्ट्रवादीत किती आमदार उरले? जयंत पाटलांनी सांगितली नेमकी आकडेवारी

“राष्ट्रवादीला महाविकास आघाडी एकत्र ठेवायची आहे. त्यामुळे आमचा बळी गेला तरी चालेल. पण, महाविकास आघाडीच्या एकत्रेसाठी उभे राहू,” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

हेही वाचा : “राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरोधात…”, अजित पवारांच्या बंडानंतर एकनाथ खडसेंचा भाजपावर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमदार कुठेही असले, तरी सर्वजण परिस्थिती पाहत आहेत. ज्या पद्धतीने कराडमध्ये शरद पवारांना प्रतिसाद मिळत आहे. यानंतर प्रत्येक आमदाराला ही भीती वाटेल, की येणाऱ्या काळात शरद पवार दौरे सुरु करतील; आणि माझ्या मतदारसंघात सभा घेतील. त्यानंतर माझ्या मतदारसंघात वातावरण काय होईल,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.