बेळगाव जिल्ह्यातील बागलकोट मार्गावर आज (शनिवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रक उलटून झालेल्या अपघातात २१ मजूर ठार झाले आहेत; तर १४ जण जखमी झाले आहेत. यामध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. मृत मजूर हे कर्नाटकमधील यादगिरी येथील आहेत.
कर्नाटकातील गुलबर्गा येथे मजुरी काम करणारे हे मजूर ट्रकमधून कोकणात सावंतवाडी येथे येत होते. आज पहाटे हा ट्रक हलकी कोर्सजवळ एका वळणावर उलटला. ट्रकमधून प्रवास करत असलेले ३५ मजूरांपैकी २१ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १४ जण जखमी असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2013 रोजी प्रकाशित
बेळगावजवळील ट्रक अपघातात २१ मजुरांचा मुत्यू
बेळगाव जिल्ह्यातील बागलकोट मार्गावर आज (शनिवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रक उलटून झालेल्या अपघातात २१ मजूर ठार झाले आहेत
First published on: 16-11-2013 at 09:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka 21 feared dead as truck carrying labourers turns over