सोलापूर : Karnataka Assembly Elections कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरताना मी पुन्हा येईन असा पुनरूच्चार केला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. फडणवीस यांच्या या दाव्यातून भाजपची सत्तेची भूक स्पष्ट होते. त्यासाठी भाजप काहीही करायला तयार असतो, असा टोला पटोले यांनी लगावला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पटोले यांनी पंढरपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपला लक्ष्य बनविले.
हेही वाचा >>> “कर्नाटकमध्ये बहुमताने भाजपचा विजय होणार”- चंद्रशेखर बावनकुळे
मागील २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असा जोरदार दावा केला होता. परंतु ते पुन्हा सत्तेवर आले नाहीत. फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहणाऱ्यांपैकी आहेत. शिवसेना फोडून ते पुन्हा सत्तेवर आले उपमुख्यमंत्री म्हणून. माझ्यासारखा असता तर तर उपमुख्यमंत्रिपद घेतलेच नसते. यावरून फडणवीस यांची सत्तेची लालसा दिसून येते, असा टोला पटोले यांनी लगावला. भाजपला उत्तर आणि मध्य भारतात गाय ही माता वाटते. त गोवा आणि उत्तर-पूर्व भागात खायची वस्तू वाटते. गायीप्रमाणे भाजपचे माणसांबद्दलचे मत असणार आहे. तूया अर्थी भाजपवाल्यांना मराठी माणसांविषयी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त सत्ता पाहिजे आहे, अशी टीका त्यांनी केली.