नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा)यांच्या वतीने सोमवारी दुपारी साडेतीन वाजता निमा हाऊस येथे केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. निमाच्या वतीने दरवर्षी अर्थसंकल्पावर व्याख्यान आयोजित केले जाते. अर्थसंकल्पातील तरतुदी व उद्योग विश्वासाठी असलेल्या विशेष बाबी यांविषयी सोप्या भाषेत डॉ. गोविलकर हे समजावून सांगणार आहेत. या वेळी उपस्थित राहून लघू, मध्यम व मोठय़ा उद्योगासाठीच्या तरतुदी व बदल तसेच सेवाकर, प्राप्तिकर, अबकारी कर यांसह विविध करांविषयी उद्योजक व प्रतिनिधींनी जाणून घेण्याचे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष के. एल. राठी, मनीष कोठारी आदींनी केले आहे.