वेकोलीच्या सिनाळा भूमिगत कोळसा खाणीतील खोल खड्डय़ात पडून पूर्ण वाढ झालेल्या एका बिबटय़ाचा मृत्यू झाला. वेकोलीच्या मातीच्या ढिगाऱ्यावरून हा बिबटय़ा या खड्डय़ात पडला असावा, असा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नववर्षांतील ही पाचवी घटना आहे.
नववर्षांत १ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या ३८ दिवसात दोन वाघिणी व तीन बिबटय़ांचा मृत्यू झालेला आहे. १ जानेवारीला मुधोली येथे वाघिणीचा संशयास्पद मृत्यू, त्यानंतर ११ व १६ जानेवारीला उमरी पोतदार येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत्युमुखी पडली, तर १७ जानेवारीला जानाळा येथे विजेच्या खांबावर चढलेल्या बिबटय़ाचा मृत्यू झाला, तसेच २१ जानेवारीला वनराजीक महाविद्यालयामागे वेकोलीच्या मातीच्या ढिगाऱ्यांवर दोन बिबटय़ांची जोडगोळी दिसून आली. या प्राण्यांच्या संरक्षणाकडे वनखात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे बिबटय़ांच्या मृत्यूच्या घटना वाढत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2015 रोजी प्रकाशित
कोळसा खाणीत बिबटय़ाचा मृत्यू
वेकोलीच्या सिनाळा भूमिगत कोळसा खाणीतील खोल खड्डय़ात पडून पूर्ण वाढ झालेल्या एका बिबटय़ाचा मृत्यू झाला.
First published on: 09-02-2015 at 01:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard fall in mine died