बीड जिल्ह्यातील निवडणुकीत परळी व बीड पालिकेत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. येथील निवडणुकीसाठी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे पक्षनेते धनंजय मुंडे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती.  होम ग्राऊंड असलेल्या परळी पालिकेत पंकजा मुंडे यांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. येथील ३३ पैकी तब्बल २७ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. या निवडणुकीत धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंना वरचढ ठरले. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनाही या निवडणुकीत चांगलाच फटका बसला. परतूरमध्ये बबनराव लोणीकर यांच्या पत्नी मंदा लोणीकर यांचा पराभव झाला. तर भोकरदन पालिकेतही रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी ३ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. काँग्रेस व राष्ट्रवादीला एक-एक ठिकाणी नगराध्यक्षपद मिळाले.

जालना जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल:
जालना: शिवसेना ३, भाजप ६, काँग्रेस १०, राष्ट्रवादी ४, अपक्ष १, नगराध्यक्ष: काँग्रेसच्या संगीता गोरंट्याल
भोकरदन: शिवसेना ०, भाजप ४, काँग्रेस ९, राष्ट्रवादी ४, नगराध्यक्ष: काँग्रेसच्या मंजुषा देशमुख
अंबड: शिवसेना १, भाजप ६, काँग्रेस ५, राष्ट्रवादी ५, रासप २, नगराध्यक्ष: भाजपच्या संगीता कुचे
परतूर: शिवसेना २, भाजप ६, काँग्रेस १०, राष्ट्रवादी ०, अपक्ष २, नगराध्यक्ष: काँग्रेसच्या विमल जेथलिया

बीड जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
बीड: काकू-नाना आघाडी १४, शिवसेना ०, भाजप १, राष्ट्रवादी ९, एमआयएम २, माजलगाव: शिवसेना २, भाजप ५, आघाडी १०, राष्ट्रवादी ८, एमआयएम १, नगराध्यक्ष: भाजप पुरस्कृत सहाल चाऊस
परळी-वैजनाथ: शिवसेना १, भाजप ४, काँग्रेस १, राष्ट्रवादी २७, नगराध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोजिनी हालगे
अंबेजोगाई: भाजप ६, काँग्रेस ६, राष्ट्रवादी १६, नगराध्यक्ष: काँग्रेसच्या रचना मोदी
गेवराई: शिवसेना १, भाजप १८, नगराध्यक्ष: भाजपचे सुशील जवंजाळ
धारूर: भाजप ९, राष्ट्रवादी ६, जनविकास आघाडी २, नगराध्यक्ष: भाजपचे स्वरुपसिंह हजारी

उस्मानाबाद जिल्ह्यातील निकाल
उस्मानाबाद: शिवसेना ११, भाजप ८, काँग्रेस २, राष्ट्रवादी १७, अपक्ष १, नगराध्यक्ष : शिवसेनेचे मकरंद राजे निंबाळकर
परांडा: शिवसेना ४, भाजप ४, राष्ट्रवादी ९, नगराध्यक्ष: राष्ट्रवादीचे झाकीर सौदागर
भूम: काँग्रेस ३, राष्ट्रवादी १४, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे
कळंब : काँग्रेस ७, राष्ट्रवादी १०, नगराध्यक्ष: राष्ट्रवादीच्या सुवर्णा मुंडे
तुळजापूर : भाजप ६, राष्ट्रवादी १४, नगराध्यक्ष: अर्चना गंगणे
मुरूम: शिवसेना २, काँग्रेस १५, नगराध्यक्ष: काँग्रेसचा उमेदवार
उमरगा: शिवसेना ४, भाजप ७, काँग्रेस ८, राष्ट्रवादी ३, नगराध्यक्ष: काँग्रेसचे एस. टोपगे

हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
वसमत: शिवसेना ६, भाजप ७, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ८, अपक्ष १, नगराध्यक्ष: शिवसेनेचे श्रीनिवास पोरजकर
कळमनुरी: शिवसेना ९, काँग्रेस ३, राष्ट्रवादी ५, नगराध्यक्ष: शिवसेनेचे उत्तमराव शिंदे

परभणी जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
गंगाखेड: शिवसेना २, भाजप ४, काँग्रेस ८, राष्ट्रवादी ६, रासप ३, अपक्ष १, नगराध्यक्ष: काँग्रेसचे विजयकुमार तापडिया
सेलू: शिवसेना ४, काँग्रेस ५, राष्ट्रवादी २, जनविकास आघाडी १२, नगराध्यक्ष: जनशक्ती आघाडीचे विनोद बोराडे
जिंतूर: काँग्रेस १०, राष्ट्रवादी १३, नगराध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सबिया फारुकी
मानवत: शिवसेना १०, काँग्रेस ९, नगराध्यक्ष: शिवसेनेच्या शिवकन्या स्वामी
पाथरी: राष्ट्रवादी २०, नगराध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना भोरे
सोनपेठ: काँग्रेस १२, राष्ट्रवादी ५, नगराध्यक्ष: काँग्रेसच्या जिजाबाई राठोड
पूर्णा: शिवसेना ६, काँग्रेस १, राष्ट्रवादी ८, अपक्ष ५, नगराध्यक्ष: शिवसेनेच्या गंगाबाई एकलारे

दरम्यान, मराठवाडय़ातील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या मातबर नेत्यांनी ‘कमळ’ चिन्ह टाळले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना नगरपालिकेत उमेदवारच दिला नाही. परिणामी, पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे जालन्याच्या निवडणुकीतून कमळ गायब आहे. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी मंदा लोणीकर या परतूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांनीही कमळ टाळले व ‘हाताचा पंखा’ या चिन्हावर निवडणूक लढवली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कमळ चिन्ह मिळावे म्हणून उमेदवारांमध्ये चढाओढ असे. नगरपालिका निवडणुकीत मात्र कमळ टाळणेच नेत्यांनी पसंत केले.

नगरपालिका निवडणुकीत भाजप नेत्यांचा ‘कमळा’ला टाटा

Live Updates
14:07 (IST) 28 Nov 2016
परतूरमध्ये बबनराव लोणीकर यांच्या पत्नी मंदा लोणीकर यांचा पराभव
13:13 (IST) 28 Nov 2016
परळी पालिकेच्या ३३ जागांपैकी २७ जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर
12:28 (IST) 28 Nov 2016
परभणी: पाथरी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता, २० पैकी २० जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात
12:10 (IST) 28 Nov 2016
परळीत पंकजा मुंडेंना धक्का, राष्ट्रवादी आघाडीवर
11:46 (IST) 28 Nov 2016
उस्मानाबादेत अद्याप मतमोजणीला सुरूवात नाही
11:29 (IST) 28 Nov 2016
उस्मानाबाद: भूम नगरपालिकेत राष्ट्रवादीचा विजय, १७ पैकी १४ जागांवर वर्चस्व
11:26 (IST) 28 Nov 2016
तुळजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदी अर्चना गंगणे
11:25 (IST) 28 Nov 2016
उस्मानाबाद: तुळजापूर पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता
11:19 (IST) 28 Nov 2016
बीडमध्ये ३३ पैकी पहिल्या सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय
11:18 (IST) 28 Nov 2016
बीड-परळी नगरपरिषदेत राष्ट्रवादीच्या ६ जागा
11:12 (IST) 28 Nov 2016
जालना-भोकरदनमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना धक्का