scorecardresearch

Premium

लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाईन

‘या’ अ‍ॅपवरुन घ्या चित्रपटांचा मोफत आनंद

लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाईन

करनो विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाचा ‘लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (लिफी) ऑनलाईन आयोजित केला जाणार आहे. परिणामी मोहोत्सवात प्रदर्शित केले जाणारे सर्व चित्रपट आता प्रेक्षकांना मोफत ऑनलाईन पाहाता येणार आहेत. चाहत्यांना ‘प्लेक्सिगो’ या अ‍ॅपवरुन हे सर्व चित्रपट घरबसल्या पाहाता येतील. इच्छूकांना http://www.onelink.to/Plexigo या लिंकवर जाऊन प्लेक्सिगो अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.

लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्रातील एक नामांकित फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. यंदाचे त्यांचे हे पाचवे वर्ष आहे. या मोहोत्सवात नव्या कलाकारांना प्रोत्साहन दिलं जातं. शिवाय जगभरात गाजलेल्या भारतीय आणि विदेशी चित्रपटांचं प्रदर्शन केलं जातं. यंदाच्या मोहोत्सवाची सुरुवात चित्रपट निर्माते श्री एन. एन. सिप्पी यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली जाणार आहे. शिवाय त्यांचे ‘वो कौन थी’, ‘गुमनाम, देवता’, ‘सरगम’, ‘फकिरा’, ‘चोर मचाए शोर’ असे काही गाजलेले चित्रपट देखील दाखवले जाणार आहेत. या चित्रपट मोहोत्सवासंबंधीत अधिक माहितीसाठी http://www.liffi.in या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच विवेक के : ९८२०३१०४८७, instagram.com/liffi_2020 igshid=r18uabenn51i या इन्स्टाग्राम आणि http://www.facebook.com/LIFFIIndia फेसबुक लिंकवरुन इच्छूकांना आयोजकांशी थेट संपर्क साधता येईल.

blood donation
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस: रक्तदानात महाराष्ट्र देशात अव्वल…महाराष्ट्रात मुंबई नंबर वन!  
poetry day lekh
कवितेची झोळी
national thai boxing championship, arnav nathjogi gold medal
घे भरारी! चिमूरड्या अर्णवची थाय बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्णझेप
dr babasaheb ambedkar Mahaparinirvana
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावर आधारित चित्रपटाचं शूटिंग केव्हा सुरू होणार? प्रसाद ओकनं व्हिडीओ केला शेअर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lonavla international film festival

First published on: 29-11-2020 at 11:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×