महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास महाडमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर रायगड किल्ल्याच्या परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली असून तेथील पाणीही गांधारी नदीतून सावित्री नदीला येऊन मिळते. सावित्री आणि गांधारी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने महाडला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सावित्री नदीचा उगम महाबळेश्वरमध्ये होतो. महाबळेश्वर आणि पोलादपूरमध्ये पाऊस जास्त झाल्यास महाडला पुराचा धोका असतो. महाबळेश्वरमध्ये सकाळी ८ वाजेपर्यंत २९८. ७७ मिमी पाऊस झाल्याने सावित्री नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दस्तुरी नाका ते नाते खिंड हा रस्ता पाण्याखाली गेला आहे.

रायगड जिल्ह्यातील नद्यांची पातळी
वेळ: सकाळी ०९.०० (धोका पातळी)

डोलवहाल बंधारा
कुंडलिका नदी – २३.१५ (२३.९५)

नागोठणे अंबा नदी – ७.२० (९.००)

महाड सावित्री नदी – ६.२५ (६.५०)

पाताळगंगा – १९.१५ (२१.५२)

उल्हास नदी – ४५.५० (४८.७७)

गाढी नदी – ३.१० (६.५५)

भिरा धरण – ९५.०५

पहिला व तिसरा गेट उघडले. विसर्ग – ४१. ६०