सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विश्वजित कदम यांना निर्णायक आघाडी मिळाली आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय विभुते यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकले आहे. अद्याप अंतिम निकालाची आकडेवारी जाहीर झालेली नसली तरी देखील शेवटची माहिती हाती आली तेव्हा विश्वजित कदमांना 1 लाख 31 हजार मते, तर दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला तब्बल 17,658 मिळाली होती. शिवसेनेच्या संजय विभुतेंना 6,899 मते मिळालेली होती.
एवढा मोठा फरक पाहता शिवसेनेच्या विभुतेंना ही आघाडी तोडणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे कदम यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.