Maharashtra Cabinet Meeting Decision : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२५ फेब्रुवारी) राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी सात महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या सात निर्णयामध्ये बारामती आणि परळीत पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी परळीतील पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी ५६४.५८ कोटी आणि बारामतीमधील पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली आहे. यासह मुळशी येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्याता आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले?

  • पौड,ता.मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता. (विधी व न्याय विभाग)
  • ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी (वित्त विभाग)
  • १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय, अशा ३३२ 3गावठाणासाठी ५९९.७५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी (मदत व पुनर्वसन विभाग)
  • महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता, राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती (नियोजन विभाग)
  • बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी, यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी (कृषि व पदुम विभाग)
  • परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी (कृषि व पदुम विभाग)
  • महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम १८(३) १९५५ मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला मान्यता.