राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाटय़ाच्या अंतिम टप्प्यात भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णा लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील नेत्यांपासून सर्वांनी दोघांना शुभेच्छा दिला. उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावर एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

VIDEO: “३० जून माझी तारीख असेल, १ जुलै उजाडू देणार नाही,” भाजपा नेते मोहित कम्बोज यांचा इशारा ठरला खरा; व्हिडीओ व्हायरल

उद्धव ठाकरेंच्या ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा

शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्वीट करत म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!”

chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल
eknath shinde raj thackeray (2)
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया –

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छा तसंच भविष्यात पुन्हा एकत्र येण्याच्या काही शक्यता यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या राजीनाम्याने आम्हाला आनंद झालेला नाही. एक भूमिका घेऊनच हा निर्णय घेण्यात आला होता”.

“शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं स्वीकारा,” शिंदे गटाचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले “उद्धव ठाकरेंची प्रतिमा…”

एकनाथ शिंदे यांनी यावेळी, “आमच्याकडे जास्तीचं संख्याबळ असून विधिमंडळात शिवसेना पक्ष म्हणून आम्ही कार्यरत आहोत,” असंही स्पष्ट केलं.

भाजपाचं धक्कातंत्र

एकनाथ शिंदे हे गुरुवारी दुपारी गोव्यातून मुंबईत परतले. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यावेळी फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आणि रात्री शपथ घेणार, असेच चित्र होते. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मात्र एकनाथ शिंदे हे रात्री मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे जाहीर केल़े त्यावेळी नाटय़मय घडामोडींचा पहिला अंक पाहायला मिळाला. आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, पण सरकार योग्यपणे चालेल ही जबाबदारी माझी असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. राजभवनात शपथविधी सोहळय़ाची तयारी सुरू असतानाच नाटय़मय घडामोडींचा दुसरा अंक घडला. फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी सहभागी व्हावे, असा पक्षाचा आदेश असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. फडणवीस हे नव्या सरकारमध्ये सहभागी होतील, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यानंतर थोडय़ाच वेळात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन

विधिमंडळ सचिवालयाने पत्रक जारी केलं असून त्यानुसार ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विधानसभेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी ही निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.