Shivsena vs Eknath Shinde : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे.

त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. या आमदारांना चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
loksatta chadani chowkatun Farmers movement in Punjab Central Goverment
चांदणी चौकातून : शेतकऱ्यांचं आंदोलन २.०
Ajit Pawar claims that Mahanand board resigns voluntarily decision on funding after discussion with CM
महानंदच्या संचालक मंडळाचे राजीनामे स्वखुशीनेच, निधीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर, अजित पवार यांचा दावा
Live Updates

Eknath Shinde, Maharashtra Political crisis Live Updates: एकनाथ शिंदे बंडखोरी, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे सर्व अपटेड एकाच क्लिकवर

21:57 (IST) 22 Jun 2022
मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' बंगला सोडला, मातोश्रीकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वीचं मुख्यमंत्र्याचं निवासस्थान असणारा वर्षा बंगला सोडला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी आज आपण वर्षा बंगल्यावरून मुक्काम हलवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी आपलं सामान हलवायला सुरुवात केली आहे. ते पुन्हा आपल्या घरी 'मातोश्री'वर राहायला जाणार आहेत. यावेळी वर्षा बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असून घोषणाबाजी सुरू आहे.

20:49 (IST) 22 Jun 2022
‘त्या’ पत्रावरील सही माझी नाही, बोगस; शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचा आरोप; ‘हे’ भाजपचे षडयंत्र

शिवसेना नेते व आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे, त्यांना राज्य सरकार अस्थिर करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिकांचा विचार करून एकनाथ शिंदे व आमदारांनी परत यावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.

सविस्तर वाचा

19:31 (IST) 22 Jun 2022
“होय, संघर्ष करणार”, उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर संजय राऊतांचं सूचक विधान

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेची संवाद साधला आहे. शिवसेना आणि हिंदुत्व कदापी वेगळं होऊ शकत नाही, म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे. मी याक्षणी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. सविस्तर बातमी

18:31 (IST) 22 Jun 2022
“अडीच वर्षाचा प्रवास...”; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यावर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. “अडीच वर्षाचा प्रवास...फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह! ,” असे भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

18:28 (IST) 22 Jun 2022
एकनाथ शिंदेंच्या बंडावर बोलताना उद्धव ठाकरेंनी ‘या’ शब्दात मांडली व्यथा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह करत आपली भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बंडखोर आमदारांना समोर येऊन आपण मुख्यमंत्रीपदासाठी लायक नसल्याचं सांगावं असं आवाहन केलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी सोडण्याची तयारीही दर्शवली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना उद्धव ठाकरेंनी यावेळी एक गोष्ट सांगत व्यथा मांडली.

“कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यामागची गोष्ट कोणाला माहिती नाही. ती गोष्ट अशी आहे की, एकदा एका जंगलात लाकूडतोड्या झाड तोडत होता. कुऱ्हाडीचे घाव घालत असताना तिथे राहणारे पक्षी कासावीस झाले. पण घाव घातले जात असताना झाडाला किती वेदना होत असतील. म्हणून ते पक्षी झाडासोबत बोलू लागले. पक्ष्यांनी दादा खूप दुखत असेल ना? वेदना होत असतील ना? असं विचारलं. त्यावर झाडाने मला वेदना आणि दु:ख घाव होत आहेत याचं नाही तर हा लाकूडतोड्या ज्या कुऱ्हाडीने घाव घालत आहे त्याचं लाकूड माझ्या फांदीचं आहे याच्या वेदना जास्त होत आहेत. हेच आज चाललं आहे,” अशी व्यथा उद्धव ठाकरेंनी मांडली.

सविस्तर बातमी

17:59 (IST) 22 Jun 2022
मी पद सोडायला तयार आहे – उद्धव ठाकरे

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना माझ्याकडे उत्तर आहे. मी शिवसेनेचे नेतृत्व करायला लायक नाही. मी दोन्ही पद सोडायला तयार आहे. पण त्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मना आनंद आहे, दुसऱ्या पक्षाचा होणार असेल तर तसं नको. समोर या आणि सांगा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

17:56 (IST) 22 Jun 2022
मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो – उद्धव ठाकरे

राजकारणातील जन्मदात्री शिवसेनेवर तिचंच लाकूड वापरुन कोणी घाव घालू नका. मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो. जे गायब आहेत त्यांनी माझे पत्र घ्यावे. मी पुन्हा एकदा सांगतो हा अगदिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी नाही. मी आव्हानाला सामोरं जाणारा माणूस आहे, पाठ दाखवणारा नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

17:54 (IST) 22 Jun 2022
मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा माणूस – उद्धव ठाकरे

मला कशाचाही अनुभव नसताना मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीने मी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पुरा करणारच, असे मुख्यमंत्री म्हणाले.

17:48 (IST) 22 Jun 2022
जे काही मिळालं ते शिवसेनेमुळे हे लक्षात ठेवा - उद्धव ठाकरे

२०१२ साली बाळासाहेब आपल्यातून गेले आणि त्यानंतर २०१४ साली आपण एकटे लढलो. तेव्हाही आपण हिंदूच होतो. त्यावेळी ६३ आमदार निवडून आले होते. मधल्या काळात जे काही मिळालं ते शिवसेनेमुळे मिळालं हे लक्षात ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले

17:46 (IST) 22 Jun 2022
हिंदुत्वाबद्दल विधानसभेत, विधीमंडळात बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे

शिवसेना आणि हिंदुत्व कदापी एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाऊन आलेत. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत, विधीमंडळात बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले

17:45 (IST) 22 Jun 2022
मी पहिली कॅबिनेट मिटींग अशीच ऑनलाइन केली होती - उद्धव ठाकरे

माझी जी शस्त्रक्रीया झाली होती त्यानंतरचे दोन, तीन महिने फार विचित्र होते. तो काळ फार विचित्र होते. त्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केलेली आहे. मी भेटत नव्हतो तर काम होतं नव्हती असं नाही. मी पहिली कॅबिनेट मिटींग अशीच ऑनलाइन केली होती – उद्धव ठाकरे

17:29 (IST) 22 Jun 2022
खासदार राजेंद्र गावीत उद्धव ठाकरेंसोबत

आपण शिवसेनेचे खासदार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचा निर्वाळा पालघर चे खासदार राजेंद्र गावीत यांनी दिला आहे. आपण काल मुख्यमंत्री व इतर पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत मुंबई होतो असे खासदार राजेंद्र गावीत यांनी सांगितले. शिवसेना आमदार खासदार यांच्या बैठकीचे आपल्याला निमंत्रण मिळाले नसले तरी आपण मुख्यमंत्री यांच्या सोबत आहोत असे गावीत यांनी सांगितले.

17:23 (IST) 22 Jun 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेही घेणार पत्रकार परिषद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात उद्धभवलेल्या राजकीय परिस्थितीवर फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार आहेत. त्यानंतर आता शिवसेना नेते एकनाथ शिंदेही पत्रकार परिकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

16:34 (IST) 22 Jun 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे साधणार जनतेशी संवाद

शिवसेनेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत झालेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता फेसबुक लाईव्ह आणि इतर सोशल मीडियाच्या माधम्यातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत.

15:40 (IST) 22 Jun 2022
शिवसेना विधीमंडळाच्या प्रतोदपती भरत गोगालले, एकनाथ शिंदेंची ट्विटरद्वारे माहिती

शिवसेना विधीमंडळाच्या मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमधून दिली आहे. आजच्या आमदारांच्या बैठकीबाबत सुनील प्रभू यांनी काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1539548584995332096

15:09 (IST) 22 Jun 2022
"आमदारांचं अपहरण हे...", संजय राऊतांचा भाजपावर खळबळजनक आरोप

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. शिंदे आपल्यासोबत ४० हून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेल्याचं समजत आहे. हे सर्व कटकारस्थान एकटे शिंदे करू शकत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याशिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही, असा खळबळजनक आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सविस्तर बातमी

15:05 (IST) 22 Jun 2022
नारायण राणे फडणवीसांच्या भेटीसाठी 'सागर' बंगल्यावर

केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मलबार हिल येथील सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे.

14:50 (IST) 22 Jun 2022
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत फुट पडण्याची चिन्हे; शिंदे समर्थक असल्याचे शिवसैनिकांचे समाजमाध्यांवरून संदेश

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्या संपर्क साधला जात असला तरी जिल्ह्यातील शिवसेनेत फुट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक शिवसैनिकांनी समाजमाध्यमांवरून शिंदे समर्थक असल्याचे संदेश दिले आहेत. तर, काहींनी शहरात तशाप्रकारचे फलक लावले आहेत. विशेष म्हणजे, शिंदे यांच्याविरोधात प्रतिक्रीया उमटताना दिसून येत नाही. तसेच शिंदे यांच्या बंडानंतर काही शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक गोंधळून गेले असून शिवसेनेसोबत की शिंदे यांच्यासोबत राहयचे, अशी त्यांची दुहेरी मनस्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांनी आस्ते कदम ची भुमिका घेत मौन धारण केल्याचे दिसून येत आहेत.

सविस्तर वाचा

14:44 (IST) 22 Jun 2022
शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतर कमलनाथ यांचं मोठं विधान

Maharashtra Political Crisis: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत राज्यातील स्थितीवर चर्चा केली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं शरद पवारांना सांगितलं असल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली आहे. शरद पवार भेटीनंतर कमलनाथ यांनी सिल्व्हर ओकच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे बंडखोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला कलंकित करणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1539533645421375488

14:42 (IST) 22 Jun 2022
कॅबिनेटची बैठक संपली; कोणताही ठोस निर्णय नाही

कॅबिनेटची बैठक संपली असून या बैठकीमध्ये सध्या सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

14:40 (IST) 22 Jun 2022
विश्लेषण : ठाकरे सरकार पडलं तर कशी असतील सत्तास्थापनेची समीकरणं?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेत. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने,” असं राऊतांनी ट्विटरवरुन म्हटलंय. या ट्विटनंतर आता राज्यामध्ये सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार पडणार आणि नव्याने सरकार सत्तेत येणार अशी शक्यता अधिक बळावलीय. असं असतानाच महाराष्ट्रामध्ये बहुमताचा जादुई आकडा म्हणजेच १४५ चा आकडा कोणता पक्ष आणि कशा माध्यमातून गाठू शकतो यासंदर्भातील शक्यतांची चर्चा सुरु झाली आहे. याच आकडेमोडीवर टाकलेली नजर… येथे वाचा सविस्तर वृत्त.

https://twitter.com/LoksattaLive/status/1539534103292305410

12:55 (IST) 22 Jun 2022
Nana Patole on Eknath Shinde Revolt : महाविकास आघाडी सरकार पूर्ण ताकदीने चालेल- नाना पटोले

कमालनथ शरद पवार यांच्याकडे जाणार आहेत. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. आम्ही पूर्ण ताकदीने सोबत आहोत, अशी सोनिया गांधी यांची भूमिका कमलनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार बरखास्तीवर चर्चा होणार नाही. महाविकास आघाडी सरकार पूर्ण ताकदीने चालेल. या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील.

12:54 (IST) 22 Jun 2022
Nana Patole on Eknath Shinde Revolt : उद्धव ठाकरे करोना पॉझिटिव्ह आहेत- नाना पटोले

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाला मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोना पॉझिटिव्ह आहेत. ते आभासी पद्धतीने मंत्रिमंडळाला संबोधित करतील. विधानसभा बरखास्त करण्याचा कोणताही मानस नाहीये, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे, असं नाना पटोले यांनी सांगितले.

12:49 (IST) 22 Jun 2022
महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार- नाना पटोले

काही आमदारांना मारण्यात आलं. आजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये सरकार बरखास्तीवर कोणतीही चर्चा होणार नाही. महाविकास आघाडी सरकार पूर्ण ताकदीने काम करणार. या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, असे नाना पटोले म्हणाले.

12:40 (IST) 22 Jun 2022
पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले - छगन भुजबळ

पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना लगावला आहे. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही महत्वाची भूमिका घेतली असं वाटत नसल्याचंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.

सविस्तर बातमी

12:39 (IST) 22 Jun 2022
Sharad Pawar Meeting : शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक, काय निर्णय घेणार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये गेले असून येथे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. याआधी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

12:39 (IST) 22 Jun 2022
एकनाथ शिंदेंनी खासगीत आणि माध्यमांसमोर वेगळं बोलतात असा आरोप केल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेना नेते संजय राऊतांबद्दल नाराजी जाहीर केली. संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगलं बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलत आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या या आरोपावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1539495804557496320

12:36 (IST) 22 Jun 2022
Arvind Sawant on Eknath Shinde Revolt : शिवसेना आमदारांमुळे नाहीये, शिवसेना ही शिवसैनिकांमुळे- अरविंद सावंत

आज संध्याकाळी उद्धव ठाकरे एक बैठक घेणार आहेत. या बैठकीचा अजेंडा एकच आहे की या परिस्थितीला कसे समोरे जायचे. मुळात शिवसेना ही आमदारांमुळे नाहीये. शिवसेना ही शिवसैनिकांमुळे आहे. विधानसभा बरखास्तीबाबत निर्णय होणार का यावरही चर्चा होईल, असे सावंत म्हणाले.

12:10 (IST) 22 Jun 2022
Chhagan Bhujbal on Eknath Shinde Revolt : राजकीय पक्षांनी निवडणुकीला नेहमीच तयार राहिलं पाहिजे- छगन भुजबळ

मताधिक्य आणण्याची राष्ट्रवादीला नवी गोष्ट नाहीये. राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी नेहमीच तयार राहिले पाहिजे. सरकार एवढ्या लवकर कोसळेल असं वाटलं नव्हतं. मात्र आता सध्या ही परिस्थिती समोर आली आहे, त्यावर काय करणार, असं भुजबळ म्हणाले.

11:49 (IST) 22 Jun 2022
Sanjay Raut on Eknath Shinde Revolt : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने- संजय राऊत

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केलेली असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अतिशय महत्त्वाचे ट्वीट केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

11:27 (IST) 22 Jun 2022
Bacchu Kadu on Eknath Shinde Revolt : निधीवाटपाबाबत नाराजी होती म्हणून एकनाथ शिंदेंसोबत- बच्चू कडू

आमचा शिवसेनेला संमर्पित पक्ष होता. प्रहार संघटनेने शिवसेनेच्या माध्यमातून आघाडीला पाठिंबा दिला होता. मुळातच शिवसेनेचे ७५ टक्के आमदार या बाजूला आल्यामुळे हा निर्णय घेतला गेला. वेगळी अशी व्यक्तिगत नाराजी नाहीये. नाराजी फक्त निधीच्या वाटपाबाबत आहे. निधी कमी जास्त दिला जोता. निधी वाटपात विषमता होती. हे सगळं कव्हर झालं आहे. पण शिवसेनेच्या आमदारांकडे लक्ष दिलं जायला हवं होतं ते दिलं गेलं नाही,

11:25 (IST) 22 Jun 2022
Bacchu Kadu on Eknath Shinde Revolt : भाजपाचे नेते संजय कुटे यांच्यासोबत संपर्क सुरु- बच्चू कडू

गट स्थापन करण्याच्या हालचालीला सुरुवात झालेली आहे. राज्यातील भाजपा नेत्यांसोबत संपर्क सुरु आहे. संजय कुटे यांच्यासोबत संपर्क सुरु आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

11:23 (IST) 22 Jun 2022
Bacchu Kadu on Eknath Shinde Revolt : काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू

आज रात्रीपर्यंत काय ते समजेल. एक मिटिंग शिंदे यांच्यासोबत होणार आहे. त्यानंतर काय ते ठरेल. सध्या ३५ ते ३६ आमदार आहेत. अजून तीन ते चार जण जॉईन होणार. शिवसेनेचा आकडा ३८ ते ३९ पर्यंत जाईल आणि अपक्ष असे ५० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील आमदार आमच्या संपर्कात आहेत. किती आमदार येतील हे सांगता येणार नाही. पण दोन ते तीन दिवसां हे स्पष्ट होईल.

11:12 (IST) 22 Jun 2022
गुवाहाटीतील हॉटेलमध्ये कडेकोट बंदोबस्त

एकनाथ शिंदे यांच्यसोबत असलेले बंडखोर आदार गुवाहाटीमधील रेनिसन्स हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. या हॉटेलमध्ये कोणालाही येऊ दिले जात नाहीये. हॉटेलमध्ये जायचं असेल तर कसून चौकशी केली जात आहे.

11:06 (IST) 22 Jun 2022
Ambadas Danve on Eknath Shinde Revolt : उद्धव ठाकरेंवर आमचा विश्वास- अंबादास दानवे

बाहेर गेलेले लोक आमचेच आहेत. जनता शिवसेनेसोबत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. शिवसेनेचा रोष कोणावरही नाही. आम्ही सगळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आजही आम्ही त्यांना सहकारी मानतो. त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे, असे अंबादास दानवे म्हणाले.

11:03 (IST) 22 Jun 2022
Photos: गुवहाटीमध्ये शिंदेंसोबत असणारे ‘ते’ ३३ आमदार कोण?

नाराजीचा स्फोट राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह सुरतची वाट धरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रातोरात या आमदारांनी आपला मुक्काम थेट गुवहाटीला हलवला आहे. एकनाथ शिंदे हे आज (२२ जून) पहाटेच्या सुमारास गुवहाटी विमानतळावर एकूण ४० आमदारांसोबत पोहोचले आहेत. शिवसेनेचे ३३ बंडखोर आमदार आणि त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे –

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

11:00 (IST) 22 Jun 2022
शरद पवार सिल्व्हर ओकवरून निघाले

राष्ट्रवादी काँग्रेसची नेत्यांसोबत बैठक घेऊन शरद पवार सिल्व्हर ओकवरुन निघाले आहेत. या बैठकीनंतर शरद पवार कोणाची भेट घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

10:54 (IST) 22 Jun 2022
Congress Meeting on Eknath Shinde Revolt : कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात

काँग्रेच्या महत्त्वाच्या नेत्यांमधील बैठकीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे निरीक्षक कमलनाथ यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी ही बैठक होत असून एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

10:49 (IST) 22 Jun 2022
शिवसेनेच्या आमदार, खासदारांची सायंकाळी वर्षा बंगल्यावर बैठक

शिवेसनेचे आमदार तसेच खासदार यांना वर्षा बंगल्यावर तातडीने बोलवण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांच्यात बैठक होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

10:36 (IST) 22 Jun 2022
Sanjay Raut on Eknath Shinde Revolt : राखेतून जन्म घेऊन गरुडझेप घेण्याची शिवसेनेत ताकद- संजय राऊत

भाजपाला हे सरकार कोसळेल असे वाटत असेल तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. शिवसेनेने अनेकदा राखेतून जन्म घेऊन गरुडझेप घेतली आहे. ५६ वर्षांचा हा इतिहास आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे.

10:35 (IST) 22 Jun 2022
Sanjay Raut on Eknath Shinde Revolt : एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं झालं, सकारात्मक संवाद होतोय- संजय राऊत

राष्ट्रवादी तसेच काँग्रेसवर कोणी नाराज असेल असं मला वाटत नाही. त्यांच्यासोबत आम्ही सरकारमध्ये आहोत. आम्ही एकत्र आहोत. आज सकाळीच आमचं एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं झालं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद सुरु आहे. त्यांनी सातत्याने शिवसेनेचे कार्य केलेले आहे. त्यांच्याविषयी कायम मनात सद्भावना आहे. चर्चा, संवाद सुरुच असतात. उद्धव ठाकरे यांनादेखील याबाबत कल्पना दिली आहे. बाहरे जे आहेत ते सगळेच शिवसैनिक आहेत. ते सगळे परत येतील.

10:34 (IST) 22 Jun 2022
Sanjay Raut on Eknath Shinde Revolt : सगळे लोक स्वगृही परततील याची आम्हाला खात्री- संजय राऊत

सध्या राज्यपालांना करोना झालेला आहे. त्यांना बरं वाटू द्या. त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत हे बघुयात. एकनाथ शिंदे तसेच आमचे सगळे लोक स्वगृही परततील याची आम्हाला खात्री आहे. हा आमच्या घरातील विषय आहे. ते सगळे आमच्या घरात परत येतील. त्यांच्यासोबत आमचा चांगला संवाद सुरु आहे.

10:26 (IST) 22 Jun 2022
काँग्रेस नेते कमलनाथ आणि उद्धव ठाकरे यांच्यात होणार बैठक

काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते कमलनाथ यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत १२.३० वाजता बैठक होईल. तसेच त्यानंतर त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे.

10:24 (IST) 22 Jun 2022
थोड्याच वेळात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. शरद पवार यांचे निवासस्थान असेलेल्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

10:21 (IST) 22 Jun 2022
एकनाथ शिंदे पाठिंब्याचं पत्र घेऊन मुंबईला येण्याची शक्यता

गुवाहाटी येथील बंडखोर आमदार आपले मनोगत व्यक्त करत आहेत. तसेच या बैठकीत एकनाथ शिंदे या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या बैठकीनंतर एकनाथ शिंदे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन मुंबईला येणार असल्याचं म्हटलं जातंय.

10:08 (IST) 22 Jun 2022
“लोकशाहीमध्ये असा प्रकार…”; संजय राऊतांच्या आरोपावंर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली आहे. वाचा सविस्तर...

10:02 (IST) 22 Jun 2022
एकनाथ शिंदे हेच आमचा गटनेते, बैठकीत आमदारांचा सूर

आमचा गटनेता एकनाथ शिंदे हेच आहेत असे मत गुवाहाटीमधील बंडखोर आमदारांनी मांडले आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांची बैठक गुवाहाटी येथे सुरु आहे. याच बैठकीत आमदारांनी हे मत मांडले आहे.

09:58 (IST) 22 Jun 2022
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात बॅनरबाजी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात त्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. कळवा तसेच ठाणे परिसरात शिंदे समर्थकांनी आम्ही साहेबांसोबत असे बॅनर लावण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहरातील महापालिकेतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदे यांच्या सोबत राहतील असे दावे त्यांचे समर्थक करू लागले आहेत. शिंदे यांचे काही निकटवर्तीय गुवाहाटी येथे त्यांच्या समवेत असल्याचे बोलले जाते. त्यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

09:56 (IST) 22 Jun 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण, कारभार गोव्याच्या राज्यपालांकडे?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता राज्यपालपदाचा कारभार गोव्याच्या राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन गोव्याला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

09:48 (IST) 22 Jun 2022
गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांमध्ये बैठक

एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदारांचामध्ये गुवाहाटी येथे बैठक सुरु झाली आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपती निवड होण्याची शक्यता आहे.

Shivsena Edit

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे