शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेत. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने,” असं राऊतांनी ट्विटरवरुन म्हटलंय. या ट्विटनंतर आता राज्यामध्ये सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार पडणार आणि नव्याने सरकार सत्तेत येणार अशी शक्यता अधिक बळावलीय. असं असतानाच महाराष्ट्रामध्ये बहुमताचा जादुई आकडा म्हणजेच १४५ चा आकडा कोणता पक्ष आणि कशा माध्यमातून गाठू शकतो यासंदर्भातील शक्यतांची चर्चा सुरु झाली आहे. याच आकडेमोडीवर टाकलेली नजर…

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

विधासभेची आकडेवारी कशी?
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण २८८ आमदार आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षाकडे १४५ जागा आमदरांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे समर्थन आहे. यापैकी राष्ट्रवादीचे ५३ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. शिवसेनेच्या ५६ आमदारांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना केवळ २५ आमदारांचीच गरज आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी आता आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केलाय. यामध्ये शिवसेनेचे ३३ आमदार असून इतर समर्थन करणाऱ्या अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
Maharashtra Government, Freezes, Ready Reckoner Rates, for 2024 - 2025,lok sabha 2024, elections, house buyers, land, maharashtra, marathi news,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनर दर ‘जैसे थे’
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

किमान आमदार संख्या ३८ हवी
भाजपा आणि मित्रपक्षांकडे सध्या ११३ आमदार आहेत. भाजपाचे एकूण १०६ आमदार आहेत. म्हणजेच सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि मित्रपक्षांना ३२ आमदारांची गरज आहे. मात्र पक्षांतर कायद्याचा विचार करता भाजपाला समर्थन करुन सत्तेत येणाऱ्या शिंदे गटाचा प्रयत्न असेल तर अशा बंडखोर आमदारांची संख्या किमान ३८ हवी. सत्तांतर कायदा लागू झाला तर सरकार पडेल मात्र त्या माध्यमातून भाजपा सत्तेत येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकार अल्पमतात जाईल आणि पुन्हा मध्यवती निवडणुका घ्याव्या लागतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

नक्की वाचा >> भायखळा ते भंडारदरा अन् पैठण ते अंबरनाथ… एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ३३ बंडखोर आमदारांची यादी पाहिलीत का?

काय असू शकतं गणित?
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे सरकार पडणार की नाही याबद्दल मतमतांतरे असली तरी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतांची जुळवाजुळव केली ती पाहता २५ ते ३० शिवसेना आमदार फुटल्यास सत्तेची गणित बसवणं भाजपासाठी कठीण जाणार नाही असं चित्र दिसत आहे. भाजपाचे १०६ आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे ३५ ते ४० आमदार अशी मोट बांधून भाजपा बहुमताचा १४५ चा आकडा गाठू शकते.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची; दोन दिवसांपूर्वीच पडलेली वादाची ठिणगी

शिवसेना आणि भाजपा एकत्र आल्यास?
शिवसेना आणि भाजपा आणि मित्र पक्षांसोबत पूर्वीप्रमाणे युती झाल्यास सत्ताधारी आमदारांची संख्या १६९ इतकी होते. या परिस्थितीत भाजपा हा सत्तेमधील सर्वात मोठा वाटेकरी ठरेल तर शिवसेना दुसरा मोठा पक्ष ठरेल.