औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत स शिक्षक संघटनां आक्रमक झाल्याचे दिसत आहे. काही दिवसच अगोदर वैजापुरमध्ये काही शिक्षक संघटनांनी समन्वय समिती स्थापन करून मोर्चा देखील काढला होता. या मोर्चामध्ये शिक्षक संघटनांशी संबंधित ६०० ते ७०० शिक्षक सहभागी झाले होते. या संदर्भाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले होते. हे प्रकरण तापलेलं असताना, आता विधानपरिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करून प्रशांत बंब यांनी नव्या वादाला तोंड फोडल्याचे दिसत आहे. घरभाडे भत्त्यावरून केलेल्या मागणीमुळे राज्यभरातील शिक्षक चिडलेले असताना, आता बंब यांच्या या नव्या मागणीवर पदवीधर आमदारांनी देखील आक्षेप घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केले पाहिजेत, २० वर्षांपूर्वीच खरंतर हे बंद व्हायला हवे होते. त्याऐवजी दुसरे कोणते मतदारसंघ पाहिजेत, याचा सर्वांनी मिळून विचार करावा. मी जबाबदारीने सांगतोय की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील बहुतांश आमदार हे शिक्षकांना खोटा पाठिंबा देतात. जे आमच्या पिढ्या बरबाद व्हायला कारणीभूत ठरतील. असं आमदार प्रशांत बंब यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra teacher and graduate constituencies should be closed bjp mla prashant bambas statement msr
First published on: 01-09-2022 at 13:12 IST