राज्याप्रमाणेच नाशिकमध्येही प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रचाराच्या घाईत नाशिकमध्ये एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात चक्क बाळासाहेब ठाकरे दिसले. अवाक् होऊ नका… हे बाळासाहेब ठाकरे खरे नव्हते तर प्रति बाळासाहेब होते. यवतमाळमधील सुरेश रतनलाल यादव यांना प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखलं जातं. त्यांनी सोमवारी नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विलास शिंदे यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची युती झाली. मात्र, जागावाटपावरून अनेक ठिकाणी शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे अनेकांनी बंडखोरीही केली. याचा फटका शिवसेनेला नाशिकमध्येही बसला आहे. येथील कट्टकर शिवसैनिक असलेल्या जगदीश शिरसाठ यांनी बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांच्या प्रचारासाठी प्रति बाळासाहेब ठाकरेंना आमंत्रित केलं होते. यवतमाळमधील निवृत्त शासकीय कर्मचारी असलेले सुरेश रतनलाल यादव कट्टर शिवसैनिक आहेत. गेल्या काही वर्षांपासून एक छदामही न घेता शिवसेनेचा प्रचार करतात.

Antule, Raigad, campaign of Raigad,
रायगडाच्या प्रचारात बॅ. अंतुले यांचे वलय आजही कायम
Mahayuti, Palghar,
मनसेच्या मतांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार पालघरमधून विजयी होणार- अविनाश जाधव
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Mayawati will start BSPs campaign in Maharashtra from Nagpur
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार

महायुतीच्या जागा वाटपात नाशिक पश्चिमची जागा भाजपाकडं गेली. विलास शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांसह जवळपास ३५० पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देत बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मतदानाला काही दिवस शिल्लक असताना हा प्रकार घडल्याने महायुतीतील भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना याच मतदारसंघातून एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. असे असताना ही जागा शिवसेनेला ना सोडता भाजपाला सोडण्यात आली, असा नाशिकमधील शिवसैनिकांचा आरोप आहे. भाजपा आणि शिवसेनेकडून आपल्या कार्यकर्त्यांना युती धर्म पाळावा असे आवाहन करीत बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, तरीही राज्यात काही मतदारसंघातील शिवसैनिकांमधील नाराजी दूर झालेली नाही.