सध्या सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचेच या खटल्याकडे लक्ष आहे. हा खटला जिंकण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाने वकिलांची फौज उभी केलेली आहे. न्यायालयात या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. या खटल्याच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गटातील संर्घष वाढला आहे. दरम्यान, कोर्टात जरी दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे असले, तरी कोर्टाच्या बाहेर मात्र वेगळेच चित्र आहे. कोर्टाच्या आवारात काल (२३ फेब्रुवारी) ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि शिंदे गटातील नेते राहुल शेवाळी यांनी एकत्र फोटोशूट केलं. तसेच या दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या.

हेही वाचा >>> Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला नको होता? सरन्यायाधीश म्हणतात, “तुम्ही बहुमत चाचणीला…!”

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
vk saxena eid statement
“देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यावर नाही, तर मशिदींमध्ये केले गेले नमाज पठण”, दिल्लीच्या नायब राज्यपालांचं विधान चर्चेत!
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी

राहुल शेवाळे, अनिल परब यांच्यात रंगल्या गप्पा

सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सध्या सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये दोन्ही गटाचे नेते कायद्याचा, नियमांचा आधार घेत आमचीच बाजू कशी खरी आहे, हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. या खटल्यात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एकीकडे या खटल्यावर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र काल (२३ फेब्रुवारी) कोर्टाच्या आवारात ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि शिंदे गटाचे नेते राहुल शेवळे एकत्र दिसले. या दोघांमध्ये कोर्टाच्या आवारातच गप्पा रंगल्या होत्या. माध्यमांच्या कॅमेरात ही भेट कैद होताच, दोन्ही नेत्यांनी आमचे आणखी फोटो काढा, असे मिश्किल भाष्य केले.

हेही वाचा >>> मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्या पीएला ईडीचे समन्स; उत्पादन शुल्क घोटाळ्याची होणार चौकशी

अनिल परब काय म्हणाले?

माध्यम प्रतिनिधींनी त्यांना फोटोसाठी विचारणा केली. त्यानंतर अनिल परब म्हणाले की, पाहिजे असल्यास अगोदरचेही फोटो पाठवतो. तसेच आमचे फोटो कधीही घेऊ शकता. आमचे भरपूर जुने फोटो आहेत, असे राहुल शेवाळे म्हणाले. या विधानानंतर परब आणि शेवाळे यांच्यात हशा पिकला. नंतर दोघांनीही सोबतच फोटोसेशन केले. आमचे एकत्र फोटो असले तरी आम्हाला कोणीही काही विचारू शकत नाही, असे विधान अनिल परब यांनी केले.

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा >>> “…तर घरात घुसायला वेळ लागणार नाही,” शीतल म्हात्रेंचा संजय राऊतांना इशारा; म्हणाले “आज फोटोला चप्पल…”

निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाचा निकाल रद्दबातल ठरवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाची ही मागणी न्यायालयाने तूर्तास अमान्य केली आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.