पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी हा व्यावसायिक असून त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही कालवधीत त्याचा घटस्फोटदेखील झाला होता. दोन वर्षांपूर्वी त्याची एका तरुणाशी ओळख झाली होती. ते दोघे सतत भेटत असत आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. दोन वर्षांपासून दोघांमध्ये संबंध होते.
फिर्यादी शुक्रवार पेठेत राहत असून तो वारंवार शरीरसुखाची मागणी करीत होता. या प्रकाराला कंटाळून आरोपी तरुणाने बुधवारी सकाळी फिर्यादी झोपेत असताना कोयत्याने वार केले. यात फिर्यादी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीस अटक करण्यात आली आहे.