scorecardresearch

Premium

“२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा…”, जरांगे-पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा

“मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुठला डाव रचला आहे?” असा सवालही जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.

eknath shinde manoj jarange patil
मनोज जरांगे पाटलांनी शिंदे सरकारला मराठा आरक्षणाबाबत इशारा दिला आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

२४ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द सरकारनं दिला आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं. अन्यथा सरकारला जड जाईल. आमच्यावर अन्याय करत राहिला, तर मर्यादा आणि संयम कितीदिवस बाळगायचा, याचाही विचार करावा लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. ते जालन्यातील सभेत बोलत होते.

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “सरकारच्या शिष्टमंडळानं सर्व गुन्हे मागे घेण्याचं आणि एकालही अटक न करण्याचं आश्वासन दिलं होतं. मग, आंतरवालीतील कार्यकर्त्यांना अटक का करण्यात आली? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुठला डाव रचला आहे? खोटं बोलून आमच्याशी गद्दारी करू नका. दोन दिवसांत सरकारनं सर्व गुन्हे मागे घ्यावे.”

BJP MLAs arrested for trying to besiege Karnataka Chief Ministers office
कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयास घेरावाचा प्रयत्न; भाजप आमदारांना अटक, प्रतिबंधात्मक कारवाई
Eknath Shinde with Gangster
कुख्यात गुंडांचे मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो, गुन्हेगारांचे मंत्रालयात रील्स, विरोधकांच्या टीकेनंतर सरकारची पहिली प्रतिक्रिया
Kumari anty food stall
रस्त्यावरच्या फुड स्टॉलवरील कारवाई रोखण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; कोण आहेत कुमारी आंटी
Nitish Kumar
सकाळी राजीनामा, दुपारी पाठिंब्याचं पत्र, संध्याकाळी पुन्हा शपथ; नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी!

“पाच कोटी मराठे तुरुंगात जाण्यास भीत नाही”

“पोलीस अधीक्षक आणि पोलिसांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला घडवला, हे आम्ही विसरणार नाही. पुन्हा डाव रचू नका. पहिल्या अधीक्षकांना बढती देण्यात आली. आता कार्यकर्त्यांना अटक करून दुसऱ्या अधीक्षकांना बढती देणार का? पण, आम्ही पाच कोटी मराठे तुरुंगात जाण्यास भीत नाही,” असंही जरांगे-पाटलांनी सांगितलं.

“लातूरमध्ये सभा होणार आहे”

“लातूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजाचा रोष पत्करू नये. लातूरमध्ये सभा होणार आहे,” असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला.

“ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकींच्यावर अन्याय करत आहेत”

“ओबीसीमधील जातींवरही यांनी ( छगन भुजबळ ) अन्याय केला आहे. २००९ ते २०१४ मधील ओबीसी महामंडळातील ८० टक्के हिस्सा एकट्यांनी खाल्ला आणि २० टक्के बाकींच्या ३०० जातींना दिला आहे. ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकींच्यावर अन्याय करत आहेत,” अशी टीकाही जरांगे-पाटलांनी छगन भुजबळांवर केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil warning shinde govt maratha reservation chhagan bhujbal jalana ssa

First published on: 01-12-2023 at 20:07 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×