भाजपा आमदार राम कदम यांना मराठा तरूणीचे ओपन चॅलेंज, पाहा व्हिडिओ

हिंमत असेल तर माझे आव्हान स्वीकारा, तुमच्या फोनची मी वाट पाहते आहे असेही या मुलीने म्हटले आहे

भाजपा आमदार राम कदम यांना मराठा तरूणीने ओपन चॅलेंज दिले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. दहीहंडीच्या दिवशी भाजपा आमदार राम कदम यांचा जीभेवरचा ताबा सुटला. उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन असे बेताल वक्तव्य राम कदम यांनी केले. याच वक्तव्याला आव्हान देत मीनाक्षी डिंबळे पाटील या तरूणीने एक व्हिडिओ पोस्ट केला.

”राम कदम तुम्हाला मी चॅलेंज करते, मला तुम्ही मुंबईला बोलवा किंवा मी मुंबईत येते. आल्यानंतर मला फक्त बोटाने स्पर्श करून दाखवा, उचलून न्यायची गोष्ट तर लांबच राहिली. त्याबद्दल मी नंतर बघते. तुम्ही जे वक्तव्य ते अत्यंत लांछनास्पद आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे इथे स्त्रियांचा आदर केला जातो. स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या या घाणेरड्या वक्तव्यांची महाराष्ट्रात जागा नाही. तुम्ही जे बोलला आहात त्याबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे आपण आमनेसामने भेटून बोलू. तुम्हाला मी फोन केला होता पण तुम्ही उचलला नाही. आता तुमच्या फोनची मी वाट बघते आहे. तुम्ही फोन करा आणि माझे चॅलेंज स्वीकारा अशीच माझी अपेक्षा आहे.” अशा शब्दात या मुलीने आपला निषेध नोंदवत राम कदम यांना खुले आव्हान दिले आहे.

पाहा व्हिडिओ

भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी मुलींबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले त्यानंतर त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून टीका होते आहे. विरोधकांनी माझा व्हिडिओ मोडतोड करून पोस्ट केला, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असे स्पष्टीकरण राम कदम यांनी दिले आहे. मात्र त्यांच्या वक्तव्याचा निषेध होतो आहे. आता मराठा तरूणीनेही त्यांना खुले आव्हान दिले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maratha girls open challenge to bjp mla ram kadam on his statement