मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच्या लढ्यात सहकार्य करणारे किर्तनकार अजय बारसकर यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आजवर ओबीसी नेते आणि राज्यातील काही मराठा नेते हे जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत होते. मात्र आता त्यांच्याच टीममधील एक व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गेल्याचे दिसत आहे. अजय बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील हेकेखोर असल्याचे आरोप केले. तसेच मागच्या दोन महिन्यापासून त्यांनी बंद दाराआड बैठका घेण्यास सुरुवात केल्याचाही आरोप बारसकर यांनी केला. तसेच जरांगे पाटील यांनी संत तुकाराम यांचा अवमान केला असल्याचाही आरोप बारसकर यांनी केला.

किर्तनकार अजय बारसकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मराठवाड्यात कुणबी शोधण्यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होतो. त्यामुळे मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जोडलो गेलो. पण जरांगे पाटील यांच्यासह काम करताना त्यांची हेकेखोर वृत्ती हळूहळू समजू लागली. सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये मी जरांगे पाटील यांना मसूदा वाचून त्यातील बारकावे लक्षात आणून देण्याचे काम करत होतो. एकदा त्यांनी माझा महाराज असा जाहीर उल्लेखही केलेला आहे. पण त्यांचे खरे रुप समोर आल्यामुळे मी आता जनतेसमोर येऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

amravati lok sabha seat, Navneet Rana, Ravi Rana, Abhijeet Adsul , Support from Abhijeet Adsul, Lok Sabha Election, Navneet Rana visited Abhijeet Adsul home, Navneet Rana and Ravi Rana, amravati news, lok sabha 2024, poitical news,
मनधरणीचे प्रयत्न… नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांची घेतली भेट, पण…
What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडाफोडीवरुन अमित शाह यांना टोला, देवेंद्र फडणवीसांना म्हणाले ‘चेलेचपाटे’
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

Maratha Reservation : “२४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको, तर ३ मार्चला…”, जरांगेंनी सांगितली आंदोलनाची पुढची दिशा!

जरांगेचे १०० अपराध भरले

मूळचे किर्तनकार असलेल्या बारसकर यांनी अभंग आणि पुराणातील उदाहरणे देऊन आपला मुद्दा स्पष्ट केला. शिशूपालाचे १०० अपराध भरले, हे भगवान श्रीकृष्णाने म्हटले होते. त्याप्रमाणे या जरांगेचेही १०० अपराध आता भरले आहेत. मध्यंतरी जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी मी आंतरवाली सराटी येथे गेलो होतो. मी त्यांना माझ्या हाताने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मी देहूवरून आलो असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे पाटील यांनी संताचा अवमान करणारे विधान केले. त्यामुळे मी दुःखी झालो. मला हे सहन झाले नाही, त्यामुळेच आता मी जरांगेंची पोलखोल करत आहे, असेही बारसकर यांनी सांगितले.

बारसकर पुढे म्हणाले की, जर मी बसमधून प्रवास करत असेल आणि मला जर कळलं की बसचा चालक मद्य प्यायलेला आहे. तर सर्वात आधी मी बसमधून उतरेल आणि इतर प्रवाशांनीही बसमधून उतरावे, अशी बोंब ठोकेल. आज मराठा समाजाच्या आंदोलनाचा नेतृत्व करणारा व्यक्ती असाच नशेत आहे, हे मला आवर्जून सर्वांना सांगायचे आहे, अशी टीका बारसकर यांनी केली.

“घातपातासाठी पाठवलेला कार्यकर्ता…”, नाव न घेता मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप; म्हणाले, “मी त्याला…”

मनोज जरांगे पाटील यांनी मागितली माफी

अजय बारसकर यांनी आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील संताबद्दल केलेल्या विधानाबाबत माफी मागितली. ते म्हणाले, मी उपोषणाला बसलो असल्यामुळे त्या चिडचिडीतून माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द निघाले असण्याची शक्यता आहे. पण मी संताबद्दल नाही तर बारसकर यांना उद्देशून काही बोललो होतो. पण आता माझ्या शब्दांना चुकीच्या पद्धतीने दाखविले जात आहे. त्याबद्दल मी माफी मागतो. पण अजय बारसकर हे मॅनेज झालेले आहेत, असाही आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

जरांगेच्या मुलीनेही देवाचा अवमान केला

“मनोज जरांगे हे अहंकारी आहेतच, पण त्यांच्या मुलांमध्येही हा अहंकार भरून राहिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगेंच्या मुलीने म्हटले की, ‘माझ्या वडिलांनी देवालाही झुकायला भाग पाडले’. त्या लहान मुलीने उच्चारलेले हे वाक्य जरांगेंच्या अहंकाराच्या शिकवणुकीतून आले”, असाही आरोप अजय बारसकर यांनी केला.

मी छगन भुजबळांचा, सरकारचा माणूस नाही

मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केल्यापासून माझ्यावर फुटीरतेचे आरोप लावले जात आहेत. मी सरकार आणि छगन भुजबळ यांचा एजंट आहे, असे सांगितले जात आहे. पण मी भाजपा पक्ष आणि छगन भुजबळ यांच्यावर जहाल टीका केली आहे. छगन भुजबळ माझे मित्र नाहीत. माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, असेही बारसकर यांनी जाहीर केले.