पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीला मंगळवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील संशयित सासू व सासरे फरार आहेत. पाथर्डी येथे राहणाऱ्या मनोहर पाटील याचा जानेवारी २०११ मध्ये वैशाली बिडकर हिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह झाला होता.
काही महिन्यांनी बहिणीच्या लग्नासाठी पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी पत्नीचा छळ सुरू झाला. साधारणत: वर्षभरापासून मारहाण करणे, शिवीगाळ करणे, घरातून रात्री-अपरात्री निघून जाणे, अशा पद्धतीने तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला.
यासाठी सासरे नगराज पाटील व सासू मंगला यांनी मनोहरला वेळोवेळी प्रवृत्त केले. २७ जानेवारी रोजी सायंकाळी मनोहरने चार-पाच मित्रांना सोबत घेऊन येऊन घरातील सर्व सामान हलविले व आपणास मारहाण केली, असे पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात छळ ही तक्रार दाखल केली.
मंगळवारी दुपारी पोलिसांनी पाटीलला अटक केली. या प्रकरणातील सासू, सासरे व नणंद हे तीन संशयित फरार झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2013 रोजी प्रकाशित
विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीला अटक
पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीला मंगळवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील संशयित सासू व सासरे फरार आहेत. पाथर्डी येथे राहणाऱ्या मनोहर पाटील याचा जानेवारी २०११ मध्ये वैशाली बिडकर हिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह झाला होता.
First published on: 06-02-2013 at 04:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married lady torturing husband arrested