पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या थायरॉईडच्या ५० गोळ्या; माहेरच्यांना मारायचा टोमणे

पतीकडून देण्यात येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला पीडित महिला कंटाळली होती. त्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

Rape of a young woman by showing lust for marriage
(प्रातिनिधिक छायाचित्र)

पती माहेरच्या व्यक्तींना टोमणे मारतो, मद्यपान करून मारहाण करतो, या सर्व त्रासाला कंटाळून ३१ वर्षीय विवाहित महिलेने थायरॉईडच्या ५० गोळ्या खाल्ल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी पतीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात पत्नीने तक्रार दिली आहे. मानसिक आणि शारीरिक छळ असाह्य झाल्याने असे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं चिखली पोलिसांनी सांगितले आहे. अमोल मारुती भंडारे असं आरोपी पतीचं नाव आहे. अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल हा आपल्या ३१ वर्षीय पत्नीचा दररोज शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. अमोलने नवीन घर आणि कार घेतली होती. त्याचे कर्ज फेडण्यासाठी त्याने पीडित पत्नीकडे आणि सासू सासऱ्यांकडे पैसे मागितले होते. मात्र, ते मध्यमवर्गीय असल्याने पैसे देऊ शकले नाही. याचा राग मनात धरून अमोल दररोज पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करायचा, असं तक्रारीत म्हटलं आहे.

शिवाय, मद्यपान करून आल्यावर पत्नीच्या माहेरील व्यक्तींना टोमणे तिला मारून मारहाण करायचा. काही वेळा तर पत्नीला उपाशीपोटी ठेवले. याच त्रासाला कंटाळून १५- २० दिवसांपूर्वी तिने थायरॉईडच्या तब्बल ५० गोळ्या खाल्ल्या. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. परंतु, त्रास असह्य झाल्याने पीडितेने चिखली पोलिसात तक्रार दिली आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Married woman took 50 thyroid pills because of husband trouble vsk 98 kjp

ताज्या बातम्या