अलिबाग ते पेणदरम्यान प्रवासी रेल्वेमार्गासाठी येत्या ३० जानेवारीला दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. रेल्वेमार्गाच्या अंतिम मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वे, एमएमआरडीए, राज्य सरकारची संयुक्त बैठक बोलावण्यात आली असल्याचे खासदार अनंत गिते यांनी सांगितले आहे. ते अलिबाग इथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अलिबाग ते पेण या मार्गावर प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी भेट दिली होती, त्यावेळी धरमतर ते अलिबागदरम्यान रेल्वे लाइन टाकण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सध्या अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याला लागूनच ही रेल्वे लाइन टाकण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून, कार्लेखिंड इथे बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. या रेल्वेमार्गासाठी जवळपास २३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार आहे. अलिबाग शहराचा एमएमआरडीए झोनमध्ये समावेश असल्याने या मार्गासाठी मध्य रेल्वे आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. राज्य सरकारने प्रकल्पासाठी लागणारे भूसंपादन करून द्यायचे आहे. या सर्व मुद्दय़ावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार असल्याचे खासदार अनंत गिते यांनी सांगितले आहे. या बैठकीसाठी राज्य सरकार, एमएमआरडीए यांच्या अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलवले असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting in delhi for alibough pen rail route
First published on: 30-01-2013 at 12:14 IST