रत्नागिरी जिल्ह्यात गोवा बनावटी  मद्याची विक्री करणारे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत. ते म्हणाले,  जिल्ह्यात विक्रीसाठी येणारे गोवा बनावटीचे मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले पाहिजे.  कोणाचाही फोन आला तरीही न ऐकता कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.

या बैठकीला अधिक्षक कीर्ती शेडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, गोवा बनावटीच्या मद्याची विक्री जिल्ह्यात जे कोणी करत असेल त्यांनी स्वत:हून हा गैरप्रकार बंद करावा. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे अवैध मद्य जिल्ह्यात येण्यापासून रोखण्यासाठी नाकाबंदी करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरारी पथकाने धाडी घालाव्यात. गोव्याचे मद्य जिल्ह्यात अजिबात येणार नाही, याबाबत पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सतर्क राहून काटेकोरपणे कारवाई करावी, असे ही त्यांनी सांगितले. यावेळी  बैठकीला जिल्ह्यातील वाईन शॉप, परमिट रुम संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.