शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाकडून बंडखोर आमदारांवर गद्दार म्हणत टीका करण्यात येत आहे. तर काही दिवसांपूर्वी पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर उदय सामंतांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे.

हेही वाचा- “सुरत-गुवाहाटीचे एखाद-दुसरे खोके…”, शिवसेनेची मोखाड्यातील घटनेवरून शिंदे सरकारवर आगपाखड!

दम असेल तर…

“येत्या १५ दिवसांमध्ये ज्या ठिकाणी आपल्यावर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी एकटा जाऊन सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर ज्यांच्यामध्ये दम आहे त्यांनी आपल्या केसालाही धक्का लावून दाखवावा”, असा इशाराही त्यांनी हल्लेखोरांना दिला आहे. रत्नागिरीमध्ये दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. यावेळी सामंत यांनी विरोधक आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

पुण्यात सामंतांच्या गाडीवर हल्ला

१५ दिवसांपूर्वी पुण्यात एका कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उदय सामंतांनी हजेरी लावली होती. यावेळी सामंत यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सामंतांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. या घटनेनंतर सामंतांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. या सभेला शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता पुन्हा त्या हल्ल्याची आठवण करत सामंतांनी हल्लेखोरांना आव्हान दिले आहे.

हेही वाचा- “आम्ही नुकतीच ५० थरांची दहीहंडी फोडली”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

तर राजकारणातून निवृत्ती घेईन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जन्म दिलेल्या आईचं दूध विकलं’ अशा शब्दात माझ्यावर टीका झाली. मी हे सर्व डोक्यात ठेवलेलं आहे. याचं उत्तर दोन वर्षानंतर एप्रिल २०२४ ला देणार आहे. ते उत्तर मी जर मी दिलं नाही, तर राजकारणातून निवृत्ती घेईन, अशा इशाराही सामंतांनी अप्रत्यक्षपणे विनायक राऊत यांना दिला.