अल्पवयीन मुलीस रिक्षातून पळवून नेत शहरातील द्वारका परिसरात सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली. शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या ट्रॅक्टर हाऊसलगतच्या निर्जन परिसरात अल्पवयीन मुलगी बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर गुरूवारी शुद्धीवर आलेल्या या युवतीने पोलिसांना उपरोक्त घटनेची माहिती दिली. भंगार गोळा करून त्याची विक्री करून ही मुलगी गुजराण करते. नाशिक शहरातून गोळा केलेले भंगार ती कल्याणला नेऊन विकते. बुधवारी रात्री नाशिकरोडला जाण्यासाठी ती शालिमार चौकात उभी होती. यावेळी एका रिक्षाचालकाने नाशिकरोडला सोडतो असे सांगून रिक्षात बसविले. रिक्षात आधीच दोन जण बसले होते. या सर्वानी तिला महामार्गावरील उड्डाणपुलाच्या जवळील निर्जन परिसरात नेले. त्या ठिकाणी मारहाण करत सामुहिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून तौसीफ रफीक शहा, मोसीन दादामिया शहा व समीर हैदर शहा यांना अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2013 रोजी प्रकाशित
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
अल्पवयीन मुलीस रिक्षातून पळवून नेत शहरातील द्वारका परिसरात सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली. शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या ट्रॅक्टर हाऊसलगतच्या निर्जन परिसरात अल्पवयीन मुलगी बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
First published on: 05-04-2013 at 01:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl gangrape in nashik city