एकनाथ शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज माध्यमांशी बोलताना मंत्रीपदाबाबत सुचक वक्तव्य केले आहे. तसेच महाराष्ट्राला १८ तास काम करणारा मुख्यमंत्री भेटल्याचेही ते म्हणाले, यावेळी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी आणि राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली.

”एकनाथ शिंदेचा फोन जाईल, तो मंत्री बनेल”

‘माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ”ज्यांना आमदारांना एकनाथ शिंदेचा फोन जाईल, तो मंत्री बनेल, महाराष्ट्राला १८ तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जी कामे अर्धवट राहिली होती. ती सर्व कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पूर्ण होत आहे. तसेच १९ किंवा २० जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.”

”अनेक खासदारही संपर्कात”

यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले. ”एकनाथ शिंदे हे राज्यातील प्रमुख नेत्यापैकी एक आहे. शिवसेनेची अनेक खासदारही त्यांच्या संपर्कात आहे. हळू हळू सर्व कामे होत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

”मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा द्यावा”

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या लवकरच शिवेसेना खासदारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात बोलताना ”शिवसेना खासदारांनी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा द्यावा”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – शिवसेना-भाजपाची युती होणार? केसरकरांचं मोठं विधान, म्हणाले “पहिला फोन कोणी करायचा यावर…”