वाई : भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली. आगामी निवडणुका आणि पक्ष संघटना वाढविण्यासाठी आमदार गोरेंवर भाजपनं मोठी जबाबदारी दिली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेशवर संधी देताना त्यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे.   भारतीय जनता पक्षानं आगामी निवडणुका डोळय़ासमोर ठेवून जिल्हाध्यक्ष बदलला असून, प्रथमच आमदाराकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार जिल्हाध्यक्षपदी आमदार गोरे यांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यात एक खासदार व दोन आमदार आहेत. आगामी जिल्हा परिषद  पंचायत समिती, पालिका व बाजार समितींच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवून जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रथमच एका आमदाराकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा भाजपने दिली आहे. आमदार गोरे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यांची आक्रमकता लक्षात घेऊन जिल्ह्यात राष्ट्रवादीला टक्कर देण्याची भाजपची रणनीती आहे. आमदार गोरेंच्या या निवडीमुळे जिल्हा भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना जुन्या-नव्याचा मेळ घालत कामकाज करावे लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून पक्षात अनेक जण नाराज आहेत, त्यांनाही विश्वासात घेऊन पक्षसंघटनेत सक्रिय करावे लागणार आहे.साताऱ्यात राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी आक्रमक आमदार जयकुमार गोरे यांची निवड करण्यामागे भाजपची ही रणनीती आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla elected bjps satara district president appointment announcement upcoming elections ysh
First published on: 24-03-2022 at 00:02 IST