scorecardresearch

भंडारा पोलीस लागले ‘त्या’ मोदींच्या शोधात

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे

(संग्रहीत छायाचित्र)

गोंदिया : ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा दावा करून आमदार नाना पटोले यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

सोमवारी भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठय़ा राजकीय वादाला तोंड फोडले आहे. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा दावा केला. पण त्यांच्या या वक्तव्याने भंडारा पोलिसांना कामाला लावले आहे आणि त्यांनी मोदीचा शोध सुरू केला असल्याची माहिती भंडाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. भंडारा पोलीस दलातील उपविभागीय अधिकारी अरुण वायकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, १६ तारखेच्या घटनेबाबत समाज माध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि ज्या काही तक्रारी आल्या आहेत त्याबाबत आम्ही चौकशी करत आहोत. चौकशीला आता सुरुवात झालेली आहे. चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्याबाबत कळवले जाईल. मात्र आता चौकशील सुरुवात केलेली आहे आणि अद्याप कुणालाही अटक केलेली नाही, असे अरुण वायकर यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mla nana patole bhandara police started searching that modi zws