औरंगाबाद पश्चिमचे आमदार तथा बाळासाहेबांची शिवसेनेचे विधानसभेतील प्रतोद आमदार संजय शिरसाट यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी एका जेवणावळीचा व्यवसाय करणाऱ्याला देयकावरून हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याची मोबाईलवरील संभाषणाची कथित ध्वनिफित प्रसारित झाली आहे.

हेही वाचा- शिंदे गटात अस्वस्थता? दीपक केसरकर म्हणाले, “सत्तारांना किती गांभीर्याने…”

यासंदर्भात सिद्धांत शिरसाट यांच्याशी व पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्याशी थेट संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नसल्याने कथित ध्वनिफितीविषयी पुष्टी मिळू शकली नाही. मात्र, याप्रकरणी सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंद करावा, अशी तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आल्याची माहिती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. अरविंद कांबळे यांनी दिली.

हेही वाचा- शिंदे गट आणि भाजपा वाद विकोपाला: वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीनुसार सिद्धांत शिरसाट यांनी एका सामान्य व्यक्तीला हातपाय तोडण्याची तसेच जिवे मारण्याची मोबाईल फोनवरून धमकी दिली. त्रिशरण गायकवाड, असे धमकी दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गायकवाड यांचा मुकुंदवाडी परिसरात जेवणावळीचे कंत्राट घेण्याचा व्यवसाय आहे. २०१७ मध्ये आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त जेवण्याची व्यवस्था करण्यासाठीचे काम गायकवाड यांना देण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्तचेही जेवणाचे काम देण्यात आले होते. दोन्ही कामे व्यवस्थित पार पडल्यानंतर त्याचे एकूण साडे चार लाख रुपये देयक झाले होते. परंतु आमदार व नगरसेवकांनी पदाचा गैरवापर करून दबाव टाकून ७५ हजार रुपये माफ करायला भाग पाडले. त्यानंतर उर्वरीत रक्कम देण्यासाठी त्यांनी जवळपास चार-पाच वर्षांचा कालावधी लावला. अनेकवेळा त्यांच्या कार्यालयाला हेलपाटे मारले. त्यानंतरही रक्कम मिळत नव्हती. १७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास २० हजार रुपयांची बाकी मागण्यासाठी सिद्धांत शिरसाट यांना फोन केला असता त्यांनी मारण्याची धमकी देऊन त्रिशरण गायकवाड यांच्यावर दबाव टाकल्याचे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. अरविंद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.