कंगना रणौत प्रकरणावरुन सध्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेले शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. कंगनावर टीका करताना हरामखोर मुलगी असा शब्दप्रयोग केल्याने राऊतांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. विरोधकांसह अनेक सेलिब्रेटींनीही यावर नाराजी व्यक्त करत राऊतांनी माफी मागायला हवी अशी मागणी केली. याप्रकरणी संजय राऊतांनी सकाळी एक सूचक ट्विट करत विरोधकांना इशारा दिला.
जय महाराष्ट्र!!! pic.twitter.com/vbqTMG0KQ5
आणखी वाचा— Sanjay Raut (@rautsanjay61) September 6, 2020
राऊतांच्या या ट्विटला उत्तर देताना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी…राऊतांना मार्मिक टोला लगावला आहे.
मेरी बेशर्मी को परखने की गुस्ताखी न करना,@rautsanjay61
पहले भी आप कई तूफानों से मूॅंह काला कर चुके है… https://t.co/t4Vnp0lDaO— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 6, 2020
कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेने कंगानला आपल्या टीकेचं लक्ष्य करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच असल्याचं सांगितलं होतं. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी कंगनाच्या पुतळ्यांना चपलांनी चोप देत आपला निषेध व्यक्त केला. भाजपानेही याप्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. सुशांत सिंह प्रकरणातील चौकशीवरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याची टीका भाजपाने केली आहे.