जालना :  शेततळ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू झाला. ही घटना जालना तालुक्यातील कडवंची येथे घडलीय. समाधान माणिक वानखेडे (वय २३) आणि सुमित्रा माणिक वानखेडे (४०) अशी मृत माय लेकराची नावे आहेत. समाधान आणि त्याची आई सुमित्रा दोघे ही सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतात गेले होते. मात्र दुपार झाली तरी दोघेही कसे परतले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शोधण्यास सुरुवात केली. मात्र ते कुठेही मिळून आले नाहीत. दरम्यान काही वेळानंतर नातेवाईकांना शेततळ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. याची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
pimpri police constable suspended marathi news,
पिंपरी : आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित
Watermelon, cucumber or spinach? Know which water-rich food will keep you hydrated and fit this summer
उन्हाळ्यात कलिंगड, काकडी टोमॅटो पालक का खावे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….
millions of old vehicles running on pune road no re registration after fifteen years
पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहने! पंधरा वर्षे होऊनही पुनर्नोंदणी नाही