राजकारणात कितीही डावपेच केले, टीकाटिप्पण्या केल्या तरी राजकारणाबाहेर नेत्यांची चांगलीच गट्टी जमते. नेत्यांच्या राजकारणापलिकडच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन अनेक नेते एकमेकांशी सख्य ठेवून असतात. अशाच एका मैत्रीचं उदाहरण आज पाहायला मिळालं ते म्हणजे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं.

सुजय विखे पाटलांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते पार्थ पवार यांच्यासोबत विमानात बसलेले दिसत आहेत. या फोटोला विखे पाटलांनी कॅप्शनही असंच दिलेलं आहे. सर्व सीमांच्या पलिकडची मैत्री असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलेलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फोटोवर अनेकांनी संमिश्र कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी या कमेंट्समध्ये आपली मतं मांडली तर काही जणांनी या दोघांचीही चांगलीच फिरकी घेतली. तर काही कमेंट्समध्ये या दोघांच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. आता या दोघांच्या या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा झाली की ही भेट निव्वळ दोघा मित्रांची होती, याचं उत्तर कदाचित वेळच देऊ शकेल.