एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेलं आंदोलन मागे घेतल्यावर दुसऱ्या दिवशी अहमदनगरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. आज (२९ ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शेवगाव आगरात आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दिलीप काकडे यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता वाढ आणि घरभाडे भत्ता वाढ या मागण्यांसाठी नुकतंच काम बंद आंदोलन सुरू झालं होतं. मात्र, राज्य शासनाने यातील काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट एसटी कामगार संघटनेचे सदस्य होते. ५६ वर्षीय दिलीप काकडे यांनी बसच्याच मागच्या शिडीला गळफास घेत आत्महत्या केल्यानं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीय.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

“गेल्यावर्षभरात २५ पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या”

प्रविण दरेकर म्हणाले, “शेवगाव येथे दिलीप काकडे नावाच्या एसटी बस चालकाने एसटीमागे जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. केवळ पगार वेळेत मिळत नाही म्हणून गेल्यावर्षभरात २५ पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारचं एसटी कर्मचाऱ्यांबाबतचं धोरणच अशा आत्महत्यांना कारणीभूत आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.”

“अशाच आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल”

“एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगता आणि दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचारी वैफल्यातून आत्महत्या करतात. आता तरी सरकार जागं होणार आहे की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या अशाच आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल,” असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिलाय.

“तळपायाची आग मस्तकात जाणारी, मनाचा थरकाप उडवणारी घटना”

गोपीचंद पडळकर म्हणाले, “तळपायाची आग मस्तकात जाणारी, मनाचा थरकाप उडवणारी, ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत दु:खद घटना घडलीये. अहमदनगर विभागातील शेवगाव आगारात दिलीप खटके या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीये. खटके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. हे दु:ख शब्दात सांगणही कठीण आहे.”

हेही वाचा : आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘एसटी’ला शासनाकडून दिलासा ; ६०० कोटी रुपयांची मदत मिळणार

“माझी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका. एकजूटीनं आपण हा लढा लोकशाही मार्गानं जिंकू. या आत्महत्या केलेल्या २८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ,” असंही पडळकर यांनी म्हटलं.