गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कारण शिवसेना आणि भाजपा नेत्यांचे एकमेकांवरील आरोप दिवसेंदिवस वाढत आहेत. किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात तर चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यातच आता नारायण राणे आणि शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. मातोश्रीच्या चार नेत्यांना लवकरच ईडीची नोटीस पाठवली जाणार असून सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू होईल, असं ट्वीट नारायण राणेंनी केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आज विनायक राऊत, संजय राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या आणि नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा हे राणेंकडून शिकावं” ; विनायक राऊतांनी साधला निशाणा!

thane lok sabha marathi news, naresh mhaske marathi news
नरेश म्हस्केंच्या मिरवणुकीकडे गणेश नाईक समर्थकांची पाठ
Uddhav Thackerays Criticism on Sanjay Mandalik and Dairhyasheel Mane
गद्दारांचा सूड घ्यायला कोल्हापुरात आलोय; उद्धव ठाकरे यांचे संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यावर टीकास्त्र
kolhapur, rajekhan jamadar, satej patil, rajekhan jamadar criticses satej patil, kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, shivsena, congress, lok sabha 2024, election campaign, kolhapur news,
खासदार मंडलिक कुणाच्या नादाला लागलेले नसल्याने त्यांचा संसार टिकून; राजेखान जमादार यांची सतेज पाटील यांच्यावर घणाघाती टीका
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर

“महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी भाजपाने आघाडी उघडली आहे. राज्यातील सरकार चांगलं काम करतंय. मात्र, भाजपाला ते सहन होत नाहीये. किरीट सोमय्यांच्या माध्यमातून मुंबईत आणि महाराष्ट्रात तीन पैशांचा तमाशा होताना दिसतोय,” असं त्या म्हणाल्या. तसेच “नारायण राणेंनी दिशा सालियानबद्दल काढलेले उद्गार एक महिला म्हणून उद्विग्न करणारे आहेत. तिच्या रिपोर्टला खोटं ठरवण्याचं काम केंद्रीय मंत्रीपदावरील व्यक्ती करत आहे. दिशाच्या वडिलांनी सर्वांना हात जोडून विनंती केली होती की तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे आलं ते आम्हाला मान्य आहे. परंतु तिच्या मृत्यूला इतके दिवस उलटल्यानंतर राणेंकडून तिच्यावर बलात्कार झाल्याचं म्हटलं  जातंय. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात लक्ष घालावं आणि कारवाई करावी,” अशी मागणी पेडणेकर यांनी केली.

“भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, तोच गुन्हा ‘मातोश्री’नं केला”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप!

यावेळी त्यांनी अन्वय नाईक प्रकरणाचाही उल्लेख केला. “नाईक यांचे कुटुंबीय टाहो फोडून न्याय मागत आहेत. भाजपाच्या काळात तर त्यांना न्याय देता आला नाहीच. माझं आव्हान आहे, ज्या सीबीआय ला केस दिली त्याचं काय झालं? ते आम्हाला सांगा. आमचीही उत्सुकता वाढतीये,” असे म्हणत त्यांनी आव्हान दिलं आहे.