मुंबई, नागपूर व नाशिकच्या संघांनी येथे जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने आयोजित सातव्या कुमार-कुमारी तलवारबाजी राज्य अजिंक्यपद स्पर्धेवर ठसा उमटविला. मुंबईच्या मुलांनी ईपी प्रकारात तर सॅबर प्रकारात नाशिकने विजेतेपद मिळविले. नागपूरच्या मुलींनी दोन्ही प्रकारांत बाजी मारून दुहेरी मुकूट मिळविला.
वैयक्तिक गटात फॉइल प्रकारात पार्थ सुतारने (नाशिक) प्रथम क्रमांक मिळविला. ईपी प्रकारात ललित गिरासे (धुळे) तर सॅबर प्रकारात आदित्य मोरे (नाशिक) व सायली उके (नागपूर) यांनी अव्वल स्थान मिळविले. ठाण्याच्या साक्षी लोकवाणीने फॉइल व ईपी दोन्ही प्रकारांत विजेतेपद मिळविले. सांघिकमध्ये मुलांच्या गटात फॉइल प्रकारात औरंगाबादने द्वितीय तर नागपूर व धुळ्याने संयुक्तपणे तृतीय स्थान मिळविले. मुलींमध्ये ठाण्याने द्वितीय तर नाशिकने तिसरे स्थान प्राप्त केले. ईपी प्रकारात मुलांच्या गटात ठाणे द्वितीय तर धुळे व नागपूर तृतीय स्थानी राहिले. मुलींमध्ये लातूर द्वितीय तसेच नाशिक व ठाणे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला. सॅबर प्रकारात मुलांमध्ये नागपूर द्वितीय, औरंगाबाद व परभणी तृतीय तर मुलींमध्ये नाशिकने द्वितीय, लातूर व सांगली यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिक जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम वीर यांच्या हस्ते व नगरसेवक दत्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल तोरणे, नितीन इंडस्ट्रिजच्या संचालिका दीक्षा अग्रवाल, राज्य संघटनेचे खजिनदार डॉ. पांडुरंग रणमाळ, सहसचिव डॉ. उदय डोंगरे, दिलीप घोडके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुकर देशमुख यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
मुंबई, नागपूर व नाशिकचे वर्चस्व राज्य कुमार-कुमारी तलवारबाजी स्पर्धा
प्रतिनिधी नाशिक मुंबई, नागपूर व नाशिकच्या संघांनी येथे जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने आयोजित सातव्या कुमार-कुमारी तलवारबाजी राज्य अजिंक्यपद स्पर्धेवर ठसा उमटविला. मुंबईच्
First published on: 06-12-2012 at 05:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai nagpur and nasik dominate