Aurangabad Clases MVA Rally vs BJP Yatra Live: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेविषयी कमीलीची उत्सुकता निर्माण झाली होती. ही राज्यातील सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच मविआची जाहीर संयुक्त सभा असल्यामुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे झाल्याचं दिसून आलं. त्याचवेळी भाजपा-शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्राही संभाजीनगरमध्येच काढली जात असल्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरात निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीमुळे आज मविआकडून कोणती भूमिका मांडली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

harsul jail police murder marathi news
छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह आवारात पोलिसाचा खून; एक गंभीर
madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
Despite staying in NCP Ramraje Nimbalkar group is against BJP candidate Ranjitsinh Nimbalkar
राष्ट्रवादीत राहूनही रामराजे गट भाजपच्या विरोधात
mahayuti, candidate, aurangabad constituency, lok sabha election 2024, Eknath shinde
महायुतीत औरंगाबादच्या उमेदवारीचा तिढा कायम
Live Updates

MVA Rally vs BJP’s Savarkar Yatra: महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!

20:37 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally: आधी स्वत:च्या कानफटात मारून घे - उद्धव ठाकरे

तुम्ही आम्हाला विचारताय याच्या थोबाडीत माराल का? आधी स्वत:च्या कानफटात मारून घे. आमचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाहीये. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवाय हे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे - उद्धव ठाकरे

20:35 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally: मोठी केलेली माणसं गेलीत, पण त्यांना मोठं करणारी माणसं आज माझ्यासोबत -उद्धव ठाकरे

मोठी केलेली माणसं गेलीत, पण त्यांना मोठं करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. आता महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ राज्यघटनेचं, भारतमातेचं रक्षण करण्यासाठी आहेत - उद्धव ठाकरे

20:34 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally: आधी तुम्ही शिवसेना पेलतेय का ते बघा - उद्धव ठाकरे

नड्डा म्हणाले शिवसेनेला नामशेष करा. आधी तुम्ही शिवसेना पेलतेय का ते बघा. आम्ही भाजपा संपवल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे

20:33 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally: भाजपाला मी विचारतोय, की मिंध्यांचं ओझं डोक्यावर घेऊन तुम्ही निवडणुका लढवणार आहात का? - उद्धव ठाकरे

तुम्ही महान व्यक्तींची नावं घेणार असाल, तर त्यांना अभिमान वाटेल असं किमान वागून दाखवा. मग तुमचं प्रवचन आम्हाला द्या. नुसती सत्ता पाहिजे. दिली ना सत्ता. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन हे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिलं होतं. एका पुत्रानं त्याच्या पित्याला दिलेलं हे वचन आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. मी हे स्पष्ट शब्दांत अमित शाहांना सांगितलं होतं. नाही ऐकलं. जर ऐकलं असतं, तर काय झालं असतं? आजही तुम्ही शिवसेना फोडली आणि डोक्यावर दगड ठेवून घेतलात ना? चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की ह्रदयावर दगड ठेवून हे ओझं स्वीकरालंय. भाजपाला मी विचारतोय, की मिंध्यांचं ओझं डोक्यावर घेऊन तुम्ही निवडणुका लढवणार आहात का? - उद्धव ठाकरे

20:31 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally: आत्ता जर हे शिवसेनेत असते, तर त्यांची तसं बोलायची हिंमत नव्हती - उद्धव ठाकरे

कशाला छत्रपतींचं नाव घेता? छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराची ओटी भरून तिला परत पाठवली होती. ते आमचं हिंदुत्व आहे. पण तुम्ही सगळ्यांना छळता. धाडी टाकता. एक इथला गद्दार मंत्री सुप्रिया सुळेंना शिवी देतो, हे तुमचं हिंदुत्व? तुमचा एक गद्दार सुषमा अंधारेंबद्दल खालच्या पातळीची टीका करतो. तुझ्या तोंडून हिंदुत्व बोलायची लायकी नाही. आत्ता जर हे शिवसेनेत असते, तर त्यांची तसं बोलायची हिंमत नव्हती. त्यांना लाथ मारून गेटआऊट म्हटलं असतं. मतं पटत नसतील, तर मतांवर बोला. पण महिलांविषयी बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा लोकांनी गौरव यात्रा काढावी. हे शोभत नाही - उद्धव ठाकरे

20:29 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

हिंडेनबर्ग रिपोर्टवर राहुल गांधी बोलले, तर त्यांना अपात्र ठरवलं जातं. म्हणजे तुम्ही आम्हाला विचारायचं नाही. का? तुम्ही आम्हाला विचारता ना घराघरांत ईडी, सीबीआय घुसवून? तासनतास चौकशी करत होतात. अनिल देशमुखांना उगीच बसवून ठेवलं होतं. त्यांच्या नातीचीही चौकशी करत होता तुम्ही - उद्धव ठाकरे

20:29 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

आमचं सरकार घेणारं नाही, देणारं आहे. काय दिलं आजपर्यंत? राजेश टोपे इथे बसलेत. करोनाच्या काळात सगळेच मैदानात उतरले होते. आजरी राजेश टोपेंना औषधाचं नाव विचारलं तर ते सांगतील.. पण आत्ताचे जे आरोग्यमंत्री आहेत... राहू द्या.. त्यांच्यावर कोणत्याही बाबतीत काही बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही - उद्धव ठाकरे

20:27 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

तुम्हाला विचार दुसऱ्यांचे लागतात. सभेतही वाचू का, वाचू का विचारता. त्यांना मला सांगायचंय, की तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल, पण ही जनता जेव्हा मतदानाला उतरेल, तेव्हा तुम्ही वाचू शकणार नाही - उद्धव ठाकरे

20:27 (IST) 2 Apr 2023

मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. पुन्हा एकदा सांगतो त्यांना. हिंमत असेल, अगदी भाजपातही हिंमत असेल, तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो. होऊन जाऊ द्याय. जेव्हा हवं तेव्हा वापर करुन घेतलात. काय काय चालली होती तुमची थेरं? उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा. पण आज माझ्याकडे काहीही नसताना काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष कठीण काळातही सोबत आहेत. काय तुम्ही माझं चोरणार? माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद माझ्यासमोर बसलेत. ते तर तुम्ही चोरू शकत नाही ना? - उद्धव ठाकरे

20:25 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

जेव्हा हे महाराष्ट्रात अस्पृश्य होते, तेव्हा आम्ही त्यांना खांद्यावर घेतलं. नाहीतर यांना महाराष्ट्रात ओळखत कोण होतं? जेव्हा गरज होती तेव्हा भाजपानं आपल्याला वापरून घेतलं आणि माडीवर चढल्यावर आपल्याला लाथ मारतायत. त्याच तंगड्या धरून आपल्याला त्यांना खाली खेचायचंय आता. आज मी मुख्यमंत्री नाहीये. आपल्या पक्षाचं नाव, चिन्ह त्यांनी चोरलंय. एवढंच नाही, माझे वडीलही चोरायचा प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या वडिलांना किती वेदना होत असतील. काय दिवटं कार्टं, याला बापसुद्धा दुसर्याचा लागतो - उद्धव ठाकरे

20:23 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली ५० खोक्यांना. एका कांद्याला ५० खोके, तर त्या कांद्याच्या शेतकऱ्याला किती मिळाले पाहिजेत? हे सगळं तोतयेगिरीचं सरकार चालू आहे - उद्धव ठाकरे

20:22 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

मी घराबाहेर पडलोच नाही. पण जे काम मी घरात राहून केलं, ते तुम्ही गुवाहाटी वगैरे वणवण फिरुनही करू शकला नाहीत हे महाराष्ट्र बघतोय - उद्धव ठाकरे

20:21 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

पीकविमा योजना ऐकून आम्हाला लाज वाटायला लागली की काय बाबा राजा उदार झाला आहे. आपलं सरकार होतं, तेव्हा आपण हे का नाही केलं? पण आम्ही जे बोललो, ते आम्ही दिलं - उद्धव ठाकरे

20:20 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

गंगापूरला अतिवृष्टी झाली होती. मला माहिती नाही, त्याचे पैसे मिळाले की नाही. आता अवकाळी झाली, गारपिटी झाली होती. पीकविम्यासंदर्भात आपण बीड पॅटर्न आणण्याचा प्रयत्न करत होतो. तुंबळ योजना या सरकारनं जाहीर केल्या आहेत. पीकविम्यासाठी शेतकऱ्यांनी एकच रुपया द्यायचा म्हणे. काय दानशूर आहे सरकार. पण जेव्हा शेतकरी विम्याचे पैसे मागायला जातो. तेव्हा त्याच्या हातावर १० रुपयांचा चेक दिला जातो - उद्धव ठाकरे

20:18 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा केंद्रानं एक मालकधार्जिणा कायदा आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो महाराष्ट्रात लागू होऊ दिला नाही. पण आता हे मिंधे सरकार राज्यात तो कायदा लागू करू बघतंय - उद्धव ठाकरे

20:17 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

हे जगतमित्र आहेत. ओबामांनाही हाय ओबामा, काय रे ओब्या असं म्हणतात. सगळेच यांचे मित्र. इस्रायलमध्ये लाखोंच्या संख्येनं नागरिक, पोलीस, सगळे अधिकारी संपावर गेलेत. रस्त्यावर उतरलेत. राष्ट्रपतींनीही पंतप्रधानांना झापलं. असे राष्ट्रपती पाहिजेत. तिथे पंतप्रधानांना घराबाहेर पडणं मुश्कील झालं. अखेर त्यांना तो कायदा मागे घ्यायला लागला. याला म्हणतात लोकशाही. आम्ही तुम्हाला निवडून दिलं म्हणजे तुम्ही वाट्टेल ते करावं आणि आम्ही मेंढरासारखं बे बे करत तुमच्या मागून यायचं ही लोकशाही नाही - उद्धव ठाकरे

20:15 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहात आहेत. न्यायवृंदामध्ये आपली माणसं घुसवायला मागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचं ऐकलंच पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल - उद्धव ठाकरे

20:14 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

जर वल्लभभाई नसते, तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही, हा प्रश्न आहे. त्यांनी मराठवाडा मोकळा केला. पण तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? वल्लभभाईंपासून काहीतरी घ्या ना. घुसवा फौजा पाकव्याप्त काश्मीरमध्ये. निवडणुका आल्या की लुटुपुटूचं काहीतरी करणार आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या - उद्धव ठाकरे

20:13 (IST) 2 Apr 2023
Uddhav Thackeray Speech in MVA Rally:

आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाही आहोत. देशात एक विधान, एक निशाण असं तुम्हाला राबवायचं आहे. दुसरा पक्षच तुम्हाला शिल्लक ठेवायचा नाहीये. देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे. सावरकरांचं स्वप्न होतं आसिंधू-सिंधूपर्यंत अखंड हिंदुस्थान. वर बसलेल्यांची हिंमत आहे का? अमित शाह म्हणाले होते की शिवसेनेला जमीन दाखवायची आहे. मी म्हटलं मला जमीन बघायचीच आहे. जमीन दाखवायची असेल, तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंचतरी जमीन जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानी. नाहीतर पुचाट लेकाचे हिंदुत्वाच्या गप्पा करू नका. तिकडे टाका ना धाडी - उद्धव ठाकरे

20:11 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

भाजपाचं म्हणजे दिसला भ्रष्ट, घेतला पक्षात असं चाललंय. देशभरातली भ्रष्ट माणसं या पक्षात आहेत. आणि नाव भाजपा आहे. जर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा - उद्धव ठाकरे

20:10 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

तुम्ही संगमांसोबत सत्तेत आहात. पण त्याच संगमांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मग संगमांनी हिसका दाखवल्यानंतर आता तुम्ही संगमांचं काय ताटता आहात? - उद्धव ठाकरे

20:09 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

नितीश कुमार आणि लालूंचं सरकार पाडून तुम्ही नितीश कुमारांचं काय चाटत होता? आता मोदी म्हणतायत की त्यांची प्रतिमा खराब करण्याचं काम चाललंय. कोण करतंय? आम्ही करतोय का? आमची प्रतिमा नाहीये का? तुमचा कुणीही सोम्या-गोम्या आम्हाला काहीही म्हणणार. आम्ही गप्प बसायचं. आम्ही काहीही बोललं तर आमच्यावर खटले दाखल होणार. मोदींना काहीही म्हटलं तर मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. आज देशभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जातोय - उद्धव ठाकरे

20:08 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीवरून वार करतो? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही घट्ट झालो आहोत. अमित शाहांनी पुण्यात म्हटलं की सत्तेसाठी मी तळवे चाटले. असं नाहीये की मी शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी आहे, मला ती शोभणार नाही. पण मी फक्त एवढंच म्हणालो, की आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय? - उद्धव ठाकरे

20:06 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: पदवी दाखवणार नाही, हा कुठला न्याय आहे? - उद्धव ठाकरे

पदवी दाखवणार नाही, हा कुठला न्याय आहे? पदवीचा उपयोग काय दंड घेण्यासाठी करताय की काय? - उद्धव ठाकरे

20:05 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

हल्ली काहींना डॉक्टरेटही मिळते. काहीजण पाण्याची इंजेक्शन घेऊन फिरतात. सोडून द्या त्यांना. पण आज अनेक तरुण पदवीधर होतायत. पदवी दाखवूनही एकीकडे किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी मागितली, तर २५ हजार दंड होतोय. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कॉलेजलाही हा अभिमान असायला हवा की आमच्या कॉलेजमधला एक व्यक्ती पंतप्रधान झालाय - उद्धव ठाकरे

20:04 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: आम्ही हिंदुत्व सोडलं, तर तुम्ही काश्मीरात काय सोडलं होतं? - उद्धव ठाकरे

मी काँग्रेसबरोबर गेल्यावर हिंदुत्व सोडलं असेल, तर मुफ्ती मोहम्मद सैद यांच्यासोबत तुम्ही काश्मीरात मांडीला मांडी लावून बसलात, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं. तुम्ही म्हणाल तोच हिंदू आणि तुम्ही म्हणाल तोच देशद्रोही अशी तुमची वृत्ती असेल, तर ती गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ केली आहे - उद्धव ठाकरे

20:02 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: ...तर मी इथून घरी जाऊन बसेन, पुन्हा तोंड दाखवणार नाही - उद्धव ठाकरे

मालेगावातल्या सभेत असंख्य मुस्लीम बांधव आले होते. इथेही आले असतील. माझ्यावर आरोप करतायत की मी हिंदुत्व सोडलं. तुम्ही मला एक उदाहरण दाखवा जिथे मी हिंदुत्व सोडलंय. मी आत्ता इथून घरी जाऊन बसेन, तुम्हाला पुन्हा तोंड दाखवणार नाही - उद्धव ठाकरे

20:01 (IST) 2 Apr 2023

जातीय तेढ निर्माण झाली की समजा निवडणुका जवळ आल्या आहेत. सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख झाला. जरूर काढा. हल्ली महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश सुरू झाला आहे. मुंबईत काढला होता. मुंबईत कुठून काढला मला माहिती नाही, पण शिवसेना भवनापर्यंत आणला. मी म्हटलं याचा अर्थ एकच आहे. जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता, देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही देशातल्या हिंदूंना आक्रोश करायला लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे? मविआचं सरकार होतं. हिंदू, मुस्लीम अशा कोणत्याही धर्मीयांना आक्रोश कऱण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती - उद्धव ठाकरे

20:00 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: २५ वर्षं आपण वेगळ्या भ्रमात होतो - उद्धव ठाकरे

२५ वर्षं आपण वेगळ्या भ्रमात होतो. भाजपाबरोबर आपली युती होती. दोनदा सरकार आलं. पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं का? म्हणून मला अभिमान वाटतो, मविआच्या सर्व नेत्यांना मी धन्यवाद देतो, आम्ही सोबत असताना जे भाजपाला जमलं नाही, ते मविआ सरकारनं करून दाखवलं आहे. याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. करायचं काही नाही फक्त कोंबडे झुंजवत बसायचं. निवडणुका आल्यावर जातीय तेढ निर्माण करायची - उद्धव ठाकरे

19:58 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

याच शहरात १९८८ साली महापालिका शहरवासीयांनी शिवसेनेच्या ताब्यात दिली. याच व्यासपीठावरून शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातलं होतं. तेव्हाच शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं की आजपासून या शहराचं नाव मी बदलून संभाजीनगर करतोय - उद्धव ठाकरे

19:58 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: ज्या ज्या वेळी मी या मैदानात आलो, तेव्हा... - उद्धव ठाकरे

ज्या ज्या वेळी मी या मैदानात आलो, तेव्हा कधीही गर्दीचा दुष्काळ मला दिसलाच नाहीये. उलट दिवसागणिक गर्दीचा महापूरच दिसतोय - उद्धव ठाकरे

19:54 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: काहीजण फक्त वातावरण खराब करून... - अजित पवार

काहीजण फक्त वातावरण खराब करून महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज उद्योगपती राज्यात गुंतवणूक करायला तयार नाही. राज्यातलं वातावरण चांगलं राहिलं नाही, तर कुणीही इथे गुंतवणूक करायला येणार नाही - अजित पवार

19:53 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

यांना गौरवयात्रा काढायचं सुचतंय. तुमच्यात धमक असेल, खरंच सावरकरांबद्दल तुम्हाला आदर-अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. तुमच्यात आहे का हिंमत? फक्त महागाई, बेरोजगारीवरून दुसरीकडे लक्ष जाण्यासाठी हे चाललंय. संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडण्याचं काय कारण होतं? मविआची सभा होऊ नये म्हणून? ही कुठली लोकशाही? - अजित पवार

19:49 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: यांचा पायगुण चांगला नाहीये, म्हणूनच... - अजित पवार

उद्धव ठाकरेंच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील असे उद्योग इथे येत होते. यांचा पायगुण चांगला नाही. हे आल्यानंतर सगळे उद्योग परराज्यात गेले. दोष द्यायचा कुणाला? ७५ हजार नोकऱ्या आणणार म्हणाले, पण कधी भरणार? तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालू आहे - अजित पवार

19:48 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: या सरकारला काही जनाची नाही, मनाची आहे का? - अजित पवार

मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हे नपुंसक सरकार आहे. अरे या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? या पद्धतीने हे सरकार चालवतायत का? - अजित पवार

19:47 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

यांच्या लोकांकडून अनेक महापुरुषांची बदनामी झाली. तेव्हा यांची दातखिळ बसली होती का? मध्ये सावरकरांबाबत काहीतरी बोललं गेलं. पण वडिलकीच्या नात्याने समजावून सांगितल्यानंतर ते वातावरण निवळलं. इथे गौरवयात्रा काढायला आमचा विरोध नाही. पण तुम्ही दुटप्पी राजकारण करता. छत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत आला, पण त्यांचा अपमान झाला तेव्हा तुम्हाला राज्यपालांना थांबवता आलं नाही. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही - अजित पवार

19:45 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: तुम्ही स्वत:ला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवता आणि ...

तुम्ही स्वत:ला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवता आणि मराठवाड्यातल्या जनतेचा अपमान करता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही मागणी केली की खास दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा. पण तसा दिलदारपणा या मुख्यमंत्र्यांनी दाखवला नाही - अजित पवार

19:43 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा स्वातंत्र्यसैनिकांबाबत बोलायला किती वेळ दिला? १३ मिनीट? एवढी उपेक्षा मराठवाडा स्वातंत्र्यसेनानींसाठी इतर कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केली नसेल. तेवढी या मुख्यमंत्र्यांनी केली - अजित पवार

19:42 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: आयोग जर असे निर्णय द्यायला लागलं, तर कसं होणार? - अजित पवार

एक गट बाजूला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याला मान्यता दिली. आयोग जर असे निर्णय द्यायला लागलं, तर कसं होणार? न्यायदेवतेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे. न्यायदेवता न्याय देईल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही - अजित पवार

19:40 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: ... हे महाराष्ट्राला परवडणार नाही - अजित पवार

आम्ही अनेक वर्षं राज्यकर्ते, विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. पण अशा प्रकारे कुठला निकाल दिलेला आमच्यातरी ऐकिवात नाहीये. कायद्याचा, संविधानाचा आदर करण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. पण याला तिलांजली देण्याचं काम झालं. ज्या प्रकारे महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, तसं घडत राहिलं, तर देशात स्थिरता राहणार नाही. ती देशाला परवडणार नाही - अजित पवार

19:39 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

मविआ येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सगळे जीवाचं रान करतील. सगळे कार्यकर्ते मविआचा कणा या नात्याने लढतील - अजित पवार

19:37 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मविआचं सरकार सत्तेत आलंय. आपला उद्देश तळापर्यंत पोहोचवण्यासाठी सभा घेऊ. पण तेव्हा करोनाचा काळ असल्यामुळे आम्हाला ते करता आलं नाही. नंतर काही राजकीय घटना घडल्या आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं मविआ सरकार पायउतार झालं - अजित पवार

19:25 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: एवढा भला माणूस मी पाहिला नाही - अशोक चव्हाण

एवढा भला माणूस मी पाहिला नाही. मनाचा मोठा, काम करताना पूर्ण मोकळीक. महाराष्ट्रातले अनेक प्रश्न, निर्णय घेताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत कधी वेगळी भूमिका घेतली नाही. करोनाच्या काळातही त्यांची भूमिका सकारात्मक होती - अशोक चव्हाण

19:21 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आत्ताचं सरकार सत्तेत आलं - चव्हाण

आजच्या सत्ताधाऱ्यांनी आमदारांची फोडाफोडी केली. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. आमदार गेले, पक्ष फोडला, चिन्हही गेलं अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची करणारं सरकार सध्या सत्तेत आहे - अशोक चव्हाण

19:18 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काही फरक पडणार नाही - चव्हाण

ही विराट सभा पाहिल्यावर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काही फरक पडणार नाही. ही मन की बात नाही, ही दिल की बात आहे. देवगिरी किल्ल्यासारखी मजबूत स्थिती मविआची आहे. कितीही मोठा भूकंप झाला तरी जे राहिले ते एकसंघ आहेत. गेलेत ते कावळे, राहिले ते मावळे - अशोक चव्हाण

19:14 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: ...तर मविआ १८० पेक्षा जास्त जागा जिंकेल - थोरात

आपण एकत्र राहिलो, व्यवस्थित राहिलो तर राज्यात १८० पेक्षा जास्त जागा आपण जिंकू - बाळासाहेब थोरात

19:13 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: ...याचा अर्थ असा, की वातावरण बदलतंय - थोरात

भाजपा असं समजतो की कसब्यात दगड उभा केला तरी निवडून येईल. पण जनतेनं तिथे भाजपाला नाकारलं. चिंचवडध्ये फूट पडली नसती, तर तिथेही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला असता. कर्नाटक निवडणुकीच्या सर्वेतही काँग्रेस विजयी होणार असल्याचं दिसतंय. याचा अर्थ वातावरण बदलतंय - बाळासाहेब थोरात

19:11 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: अदाणींच्या खात्यावर २० हजार कोटी आले कुठून? - थोरात

अदाणींच्या खात्यावर २० हजार कोटी आले कुठून? यावर उत्तर द्यायला अद्याप कुणी तयार नाही. या प्रश्नांचं उत्तर न देता खासदारकी काढून घेतली जाते असा हा देश सध्या चालला आहे - बाळासाहेब थोरात

19:11 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: राहुल गांधींनी फक्त मोदी आणि अदाणींच्या संबंधाबाबत विचारलं होतं - थोरात

राहुल गांधींनी विचारलं अदाणी आणि पंतप्रधानांचा संबंध काय? उत्तर न देता त्यांचं भाषण कामकाजातून बाहेर काढलं. त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देण्याची परवानगी मागूनही त्यांना बोलू दिलं नाही - बाळासाहेब थोरात

19:09 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: जो कुणी विरोधात बोलेल, त्याच्याघरी ईडी जाऊन पोहोचते - थोरात

जो कुणी विरोधात बोलेल, त्याच्याघरी ईडी जाऊन पोहोचते, पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो. पण आमच्याविरोधात कुणी बोललेलं चालणार नाही अशी परिस्थिती केंद्रात आणि राज्यात आहे. राहुल गांधींनी याविरोधात भारत जोडो पदयात्रा काढली. ३५६० किलोमीट पायी चालले. ती एक यशस्वी पदयात्रा झाली - बाळासाहेब थोरात

sharad-pawar-and-uddhav-thackeray-and-balasaheb-thorat-compressed

महाविकास आघाडीची संयुक्त सभा (संग्रहीत छायाचित्र)

MVA Rally vs BJP’s Savarkar Yatra: महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!