सत्तेत अशी व्यवस्था असू नये जी देश उद्ध्वस्त करणारी ठरेल. त्यामुळे भाजपाच्या विरोधात सगळ्या विरोधाकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपाच्या विरोधात जे आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊ. आमची ही भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आज देशात हाहाकार माजला आहे. कुणीही खुश नाही. मी महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने भूमिका मांडतो आहे. देशातलं अराजक थांबवायचं असेल तर भाजपाच्या विरोधात मोठी आघाडी होणं आवश्यक आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

माझं नाव नाना आहे दादा नाही

माझं नाव नाना आहे दादा नाही. नाना म्हणजे कुटुंब प्रमुखाला आपल्याकडे म्हटलं जातं. मी त्याच भूमिकेत आहे, पक्ष पुढे घेऊन जातो आहे. मात्र काहीजण माझ्यावर आरोप करतात की मी दादागिरी करतो. पण मी दादा नाही तर नाना आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे, राजकारणात आम्ही विजयाची घोडदौड कायम ठेवू आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ असंही नानांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी हा टोला अजित पवार यांना लगावल्याची चर्चा आता सुरू आहे.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

जागावाटपाचा कुठलाही निर्णय झालेला नाही

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असून त्यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक २१ जागा दिल्या जातील असं बोललं जातं आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचीही चर्चा आहे असं विचारलं असता नाना पटोलेंनी सांगितलं की जागावाटपाचा कुठलाही निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला नाही. हवाई पुलाव असलेल्या बातम्यांवर लक्ष देऊ नका असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. काही दिवसातच मी दिल्लीत जाणार आहे त्यानंतर हायकमांडशी चर्चा करणार आणि मग महाराष्ट्रात काय करायचं याचा निर्णय घेऊ असंही नाना पटोलेंनी सांगितलं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नाना पटोले यांनी हे उत्तर दिलं आहे. सगळ्यांचा सन्मान कसा होईल यापद्धतीने जागावाटप होईल असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

देशाला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था म्हणजे भाजपा

देशाला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था आहे ती व्यवस्था सर्वात आधी दूर करणं म्हणजेच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचं मुख्य लक्ष्य आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. २ एप्रिलला पहिली सभा संभाजीनगरमध्ये आहे. भाजपाचं महाराष्ट्रातून उच्चाटन कसं होईल ते लक्ष्य ठेवून आम्ही प्रचाराला लागतो आहोत असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. कसब्यात भाजपाची काय अवस्था ते आपण पाहिलं. अमरावतीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला. भाजपाला वाटतं आहे आम्ही सत्तेचा अमर पट्टा बांधून आलो आहोत तो पट्टा उतरवण्याची सुरूवात जनतेने केली आहे असंही नाना पटोलेनी स्पष्ट केलं.

प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव आमच्यासमोर येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही बोलणार नाही. त्यांची चर्चा उद्धव ठाकरेंसोबत सुरू आहे. मागच्या वेळचा अनुभव घेता आम्ही त्यांचा प्रस्ताव आल्याशिवाय सुरूवातीपासूनच आम्ही काही भूमिका घेणार नाही. उद्धव ठाकरेंनाही आम्ही हेच सांगितलं आहे की तुम्ही प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करा मात्र तुम्ही त्यांच्याकडून प्रस्ताव मागवा असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. भाजपाने अरबपती लोकांची कर्जं माफ केली आहेत. मात्र कर्मचारी, शेतकरी यांच्याबाबत सरकार काहीही विचार करत नाही असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. मूठभर लोकांचं कर्ज भाजपाने माफ केली आहेत मात्र शेतकऱ्यांचा विचार त्यांनी केलेला नाही.