scorecardresearch

नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार; तरुणी गर्भवती राहिल्यावर लग्नास दिला नकार

तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अमोलने घरी बोलवले. तिला नोकरी शोधल्याचे सांगितले.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : उच्चशिक्षित तरूणीला नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाने बलात्कार केला. गर्भवती झाल्यानंतर तरूणीने लग्नाची गळ घातली. युवकाने लग्नास नकार दिल्यामुळे युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल दामोदर राऊत (२६, हिंगणा रोड) असे आरोपीचे नाव आहे.


अमोल हा एका ट्रक्टर कंपनीत नोकरीवर आहे. तो पीडित तरूणीच्या घराशेजारी भाड्याने राहतो. त्यामुळे दोघांमध्ये ओळख झाली. तिला नोकरीची गरज होती. ही बाब अमोलने हेरली. तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अमोलने घरी बोलवले. तिला नोकरी शोधल्याचे सांगितले.


त्याने शारीरिक संबंधाची अट घातली. नोकरीची गरज असल्यामुळे तरूणीने त्याला होकार दिला. त्यानंतर त्याने अनेकदा नोकरी मिळवून देण्याच्या नावावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने लग्नाची गळ घातली असता अमोलने नकार दिला. त्यामुळे ती एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur man got woman pregnant by the name of giving job vsk

ताज्या बातम्या