scorecardresearch

नागपूर : दोन भोंदू बाबांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

दोन्ही भोंदूबाबाला सावनेर पोलिसांनी अटक केली आहे

Rape-1
(प्रातिनिधिक छायाचित्र)

एका १७ वर्षांच्या मुलीवर अंगारे-धुपारे देऊन पूजा करण्याच्या नावाखाली दोन भोंदबाबांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पूजा सुरू असताना मुलीचा मामा घरात आल्याने हा भंडाफोड झाला. दोन्ही भोंदूबाबाला सावनेर पोलिसांनी अटक केली. मनोहर कोल्हे (५५, हेटी,ता. सावनेर) आणि युवराज सोनटक्के (४०, पहलेपार, सावनेर) अशी भोंदूबाबांची नावे आहेत.

पीडित मुलगी १७ वर्षांची असून ती गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे एका मंदिरात पुजारी असलेल्या युवराज सोनटक्केने त्या पीडित दाम्पत्याची भेट घेतली आणि भाचीला मनोहर कोल्हे महाराजांची पूजा करण्याचा सल्ला दिला. धार्मिक श्रद्धेपोटी दाम्पत्याने भाचीसह मनोहर कोल्हे याचे हेटीतील घर गाठले. तेथे मनोहर अंगारे-धुपारे देऊन अनेक मुलींची पूजा करीत होता. त्याने दाम्पत्याला भाचीवर देवाची अवकृपा असल्याचे सांगून तिची रात्रभर पूजा करावी लागेल, असे म्हटले. त्यानुसार ३ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता मुलीला मनोहर कोल्हेने घरात नेले. त्यावेळी पुजारी युवराज हा देखील घरात घुसला. दोघांनीही मुलीला अर्धनग्न करून तिच्या अंगावर गुलाल टाकला. त्यावेळी मुलीच्या मामाला उद्या सकाळी येण्यास सांगितले. त्यामुळे मामा निघून गेला. दोन तासांत मामाला देवासाठी फुलांचा हार घेऊन आला असता दोघेही भोंदूबाबा मुलीवर सामूहिक बलात्कार करताना दिसून आले. मामाला बघताच दोघेही पळून गेले.

हा सर्व प्रकार मामाच्या लक्षात आला. त्यांनी सावनेर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून दोघाही भोंदूबाबांना अटक केली. या दोघांना आतपर्यंत अनेक अल्पवयीन मुलींची पूजा करण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सोनाली रासकर करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur two persons gang raped a minor girl msr

ताज्या बातम्या