केंद्रीय मंत्री नारायण राणे रुटीन चेकअपसाठी ‘लिलावती’मध्ये दाखल

राणे आपल्या जन आशिर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात करणार असून त्याआधी ही तपासणी करण्यात येत आहे.

High Court consoles Narayan Rane government has vowed not to take any action till the next hearing

राज्यात सध्या चर्चेत असलेला वाद आता हळूहळू थंड होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या या वादामुळे राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबली होती. मात्र आता ती लवकरच पुन्हा सुरू होत आहे. त्या आधी राणे यांनी आज आपल्या वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात हजेरी लावली.

राज्यभरात होणाऱ्या या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी हे रुटीन चेकअप करण्यात येत आहे. राणे यांना रुग्णालयात अॅडमिट केलेलं नाही, अशी माहिती भाजपा नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.

नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार होता. रायगडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.

नारायण राणे उद्यापासून महाराष्ट्रातील अर्धवट राहिलेली त्यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ पुन्हा सुरू करणार आहेत. गेल्या दोन दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर राणेंनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिंधुदुर्गमधून पुन्हा यात्रेला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राणे यांच्या दौऱ्याचा मार्ग पूर्वी होता तोच असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Narayan rane lilavati hospital routine check up informed bjp leader vsk

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या