केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत राणेंनी ठाकरेंना खोटारडा म्हटलं. तसेच मला भाजपात घेऊ नका, मंत्रीपद देऊ नका म्हणून उद्धव ठाकरे अमित शाहांना शेवटपर्यंत फोन करत होते, असा गंभीर आरोप केला. ते गुरुवारी (२२ सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे खरं बोलत नाहीत, ते अत्यंत खोटारडे आहेत. युती असताना काल-परवापर्यंत उद्धव ठाकरे अमित शाहांना फोन करत होते. मला भाजपात घेऊ नये, मंत्रिपद देऊ नये यासाठी ते शेवटपर्यंत अमित शाहांना फोन करत होते. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहेत. ते अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले हा महाराष्ट्रासाठी काळिमा आहे. त्यांनी काहीही केलं नाही.”

pm narendra modi photo removed from ncp election sign board in baramati
‘भटकती आत्मा’च्या उल्लेखानंतर अजितदादांच्या फलकांवरून मोदींची छबी गायब
raj thackeray allegation on maha vikas aghadi during campging for naryan rane
जमिनींमध्ये दलाली हेच मविआ सरकारचे उद्योग; कणकवलीतील सभेत राज ठाकरे यांचा आरोप
uddhav thackeray extremely depressed says minister shambhuraj desai zws
उद्धव ठाकरेंना लोकांचा प्रतिसाद नसल्याने त्यांच्यात मोठे नैराश्य; मंत्री शंभूराज देसाई यांचे टीकास्त्र
prakash ambedkar statement on congress leader is ridiculous says prithviraj chavan
प्रकाश आंबेडकरांचे ते विधान हास्यास्पदच- पृथ्वीराज चव्हाण

“किती मराठी मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत?”

“आज मराठी माणसावर बोलतात, त्यांनी किती मराठी मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत? किती मराठी माणसांना घरं दिली आहेत? याचं उत्तर त्यांनी द्यावं. उलट मराठी माणूस हद्दपार झाला. मराठी माणसाला वसई, पनवेल अशा दूरवरच्या भागात निघून गेला. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एका मातोश्री बंगल्याचे दोन बंगले केले. १९६६ मध्ये मराठी माणसाची मुंबईतील टक्केवारी किती होती आणि मुख्यमंत्री असताना २०२० मध्ये किती होती?” असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

“उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जावं लागेल”

नारायण राणे पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे केवळ बढाई मारतात. आदिलशाह, अफजल खान, अमूक-तमूक आणि हे शाह असा यांचा इतिहास आहे. असं बोलताना यांना काहीच वाटत नाही का? अशी टीका गुन्हा आहे. उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जावं लागेल. गिधाड वगैरे कुणाला उद्देशून बोलले आहात? ही वक्तव्य तुरुंगाचा रस्ता दाखवणारी आहेत.”

हेही वाचा : “…तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते”, गटमेळाव्यातील टीकेवरून नारायण राणेंचा हल्लाबोल

“आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही”

“खोक्यांचा विषय तर आहेच. त्याची चौकशी होणार आहे. त्यातून उद्धव ठाकरेंची सुटका झालेली नाही. सुशांत प्रकरणातूनही तुमच्या मुलाची (आदित्य ठाकरे) सुटका झालेली नाही. आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही,” असा इशारा राणेंनी ठाकरेंना दिला.