अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आता उरला नाही. भाजपने उग्र रूप धारण केले आहे. लोकांची दिशाभूल करून त्यांना आभासी स्वप्न दाखविले जात आहे. मोदी म्हणजे शेखचिल्ली, मुंगेरीलाल के सपने असल्याची खरमरीत टीका खासदार माजीद मेमन यांनी केली.
राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील शम्स चौक येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ग्राहक मंचचे माजी अध्यक्ष कमाल फारूकी, अल्पसंख्य आयोगाचे सदस्य सुरजितसिंह खुंगर, संपत डोके, माजी नगराध्यक्ष सत्तार शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मेमन म्हणाले की, देश सध्या विचित्र अवस्थेतून जात आहे. त्यासाठी योग्य पर्याय निवडण्याची वेळ आपल्यावर आली आहे. मोदी यांना पंतप्रधान बनण्याची भूक लागली आहे. त्यामुळे ते स्वतबरोबर देशाला स्वप्न दाखवित आहेत. २००२ मध्ये याच मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अथवा माफी मागावी, असे वाजपेयी यांनी सुचविले होते. वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह यांचा भाजप आता उरला नाही. आता शिल्लक असलेला भाजप खोटारडा असल्याचे त्यांनी सांगितले. समाजवादी विचारांचे खासदार डॉ. पाटील हे नेहमीच अल्पसंख्य समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळे त्यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्राहक मंचचे कमाल फारूकी यांनी, भाजप सोडल्यास देशात बहुसंख्य िहदू बांधव समाजवादी आहेत. ते नेहमीच अल्पसंख्य समाजासोबत असतात, असे सांगितले. सुरजितसिंह खुंगर यांनी पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बािशग बांधलेल्या मोदी यांनी आधी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी खोचक टीका केली. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संपत डोके यांनी प्रास्ताविक केले. इलियास पीरजादे यांनी सूत्रसंचालन केले. सत्तार शेख यांनी आभार मानले. राष्ट्रवादी, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकत्रे व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
‘मोदी म्हणजे ‘मुंगेरीलाल के सपने’’!
अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आता उरला नाही. भाजपने उग्र रूप धारण केले आहे. लोकांची दिशाभूल करून त्यांना आभासी स्वप्न दाखविले जात आहे. मोदी म्हणजे शेखचिल्ली, मुंगेरीलाल के सपने असल्याची खरमरीत टीका खासदार माजीद मेमन यांनी केली.
First published on: 01-04-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi mungerilal ke sapne mp majid memon