रेल्वे रुळावर डोके ठेवून दोन जणांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नांदगाव येथे घडली आहे. नांदगाव रेल्वे स्टेशनवर मालगाड्या जाणा-या रेल्वे रूळावर झोकून देत दोघांनी आत्महत्या केली. आज सकाळी १० वाजता हा प्रकार घडला. मृतांमध्ये एक युवक व महिलेचा समावेश आहे. युवकाचे नाव अमोल अशोक साठे (वय २९) असे असून त्याच्या खिशातून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड मिळाले. येवला तालुक्यातील कुसमाडी हे अमोलचे गाव असल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न झाले. महिलेचे (नाव समजले नाही) वय अंदाजे २५ वर्षे असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2017 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये रेल्वेखाली दोघांची आत्महत्या
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

First published on: 04-01-2017 at 14:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik police two persons commits suicide on railway track